Deepika Padukone Favourite List: दीपिका पदुकोणच्या फेव्हरेट लिस्टमध्ये रणवीर सिंगचा नाही, लिस्ट वाचून धक्का बसेल

बी टाऊन
Updated Jan 01, 2022 | 13:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Deepika Padukone Ranveer Singh: दीपिका पदुकोणने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिच्या आवडत्या यादीत कोणाचा समावेश आहे हे उघड केले आहे. तिची यादी पाहून तुम्हाला नक्की धक्का बसेल.

Ranveer Singh is not in Deepika Padukone's favorite list
दीपिका पदुकोणची फेव्हरेट लिस्ट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दीपिका पदुकोणची फेव्हरेट लिस्ट
  • दीपिकाच्या फेव्हरेट लिस्टमध्ये रणवीर सिंगचा समावेश नाही
  • 2022 साल दीपिकासाठी असणार स्पेशल

Deepika Padukone Revelation On Her Favourite List: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांची गणना बॉलिवूडच्या (Bollywood) पॉवर कपल्समध्ये केली जाते. अनेकदा हे स्टार जोडपे (Star Couple) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकताच रणवीर आणि दीपिकाचा (Ranveer And Deepika) 83 सिनेमा (83 Movie Release) रिलीज झाला आहे. या सिनेमात रणवीर सिंग (Ranveer Singh) क्रिकेटर कपिल देवच्या (Kapil Dev) भूमिकेत दिसत आहे, तर दीपिका पदुकोण त्याची पत्नी रोमी भाटियाच्या  (Romi Bhatiya) भूमिकेत दिसत आहे. लग्नानंतर रणवीर आणि दीपिका (Ranveer And Deepika Wedding) एकत्र चित्रपटात दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही जोडी खऱ्या आयुष्यापासून रील लाईफपर्यंत एकत्र दिसली आहे. पण तरीही रणवीर सिंग दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone Favourite) फेव्हरेट लिस्टमध्ये नाही.


अलीकडेच दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर एक पोस्ट (Deepika Padukone Post) शेअर केली आहे . ज्यामध्ये तिने तिच्या आवडत्या गोष्टी काय आहेत ते सांगितले आहे. यात ती स्वत: पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर फूड आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर गुलाबांचा पुष्पगुच्छ आणि चौथ्या क्रमांकावर फ्लाइट आहे. मात्र या यादीत रणवीर सिंगचे  (Ranveer Singh) नावही नाही. पोस्ट शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले - वर्षाच्या शेवटी, अन्न, फुले आणि प्रवासाशी संबंधित ते सर्व फोटो, जे मला खूप आवडतात.

सर्वांचा लाडका असणारा रणवीर सिंग हा फक्त त्याची पत्नी  (Ranveer Singh Wife) दीपिकाचा (Deepika) मात्र आवडता नाही. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण गेहरियांमध्ये (Gehraiyaan) दिसणार आहे. या चित्रपटात दीपिकाशिवाय सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि अनन्या पांडे  (Ananya Panday) हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ती शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) पठाण (Pathan)आणि हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) फायटरमध्ये (Fighter)  अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतर दीपिका आता अमिताभ बच्चनसोबत (Amitabh Bachchan) ‘द इंटर्न’ या चित्रपटात दिसणार आहे. नाग अश्विनचा सायन्स फिक्शन चित्रपट आणि द्रौपदी ना नाम यांचाही या यादीत समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी