रामलीला नंतर पुन्हा एकदा गुजराती बनणार रणवीर सिंग, व्हिडिओ शेअर करून केली नव्या सिनेमाची घोषणा

बी टाऊन
Updated May 27, 2019 | 11:49 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

सध्या रणवीर सिंग सिनेमा ८३च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नुकतीच त्याने आपला नवा सिनेमा जयेशभाई जोरदारची घोषणा केली. यात तो पुन्हा एकदा गुजराती पात्र साकारताना दिसणार आहे.

ranveer singh
रणवीर सिंग  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: बॉलिवूडचा एनर्जी किंग रणवीर सिंहचा या वर्षी गली बॉय हा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तसेच त्याच्या अभिनयाचेही कौतुक झाले. याआधी रणवीर सिंहने सिम्बा आणि पद्मावत सारखे बॅक टू बॅक हिट सिनेमे दिले. सध्या तो क्रिकेटवर आधारित आगामी सिनेमा ८३च्या शूटिेंगमध्ये बिझी आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. यासोबतच तो आता आणखी एका सिनेमात दिसणार आहे. रणवीर पुन्हा एकदा यशराज फिल्मसोबत काम करणार आहे. 

नुकतीच ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्विटवरून याची माहिती दिली. त्याने लिहिले, रणवीर सिंह आणि यशराज फिल्स जयेशभाई जोरदार घेऊन येत आहेत. या सिनेमात तो एक गुजराती पात्र साकारताना दिसणार आहे.  सिनेमाची निर्मिती मनीष शर्मा करणार आहेत. तर 'जयेशभाई जोरदार' या सिनेमातून दिव्यांग ठक्कर लेखन आणि दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. रणवीर या सिनेमाच्या घोषणेचा मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तो दिग्दर्शक दिव्यांग ठक्करसोबत गुजरातीमध्ये बोलताना दिसत आहे. 

रणवीरने सोशल मीडियावर सिनेमाची घोषणा करताना एक फोटो पोस्ट केला आहे आणि लिहिले की ही एक जादुची स्क्रिप्ट आहे. मला माझ्या आगामी जयेशभाई जोरदार या सिनेमाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. या सिनेमात रणवीर गुजराती व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. याआधी तो संजय लीला भन्साळी यांच्या गोलियों की रासलीला रामलीलामध्ये गुजराती भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेला चांगली पसंती मिळाली होती. 

रणवीर पुन्हा एकदा यशराज फिल्मसोबत काम करताना खूप एक्सायटेड आहे. त्याने बेफ्रिक्रे हा अखेरचा यशराजचा सिनेमा केला होता. बॉक्सऑफिसवर हा सिनेमा तितका कमाल दाखवू शकला नव्हता. रणवीरने आपल्या करिअरची सुरूवात यशराजच्या बँड बाजा बरात सिनेमाने केली होती. त्यामुळे आता हा सिनेमा काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

रणवीरचे काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत लग्न झाले. लग्नानंतर तो सातत्याने सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी