83 सिनेमाची ऑफर रणवीरला नाहीतर या अभिनेत्याला होती

बी टाऊन
Updated Apr 23, 2019 | 15:37 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Ranveer Singh Film 83: रणवीर सिंगचा सिनेमा ८३ ची शूटिंग १५ मेपासून सुरू होणार आहे. या सिनेमाची शूटिंग १०० दिवस चालणार आहे. अशातच रणवीरचे फॅन्स त्याला कपिल देव यांच्या लूकमध्ये बघण्यात खूप उत्सुक आहेत.

Film 83
रणवीर सिंगच्या हातातून जाणार होता सिनेमा 83   |  फोटो सौजन्य: Instagram

Kapil Dev biopic Ranveer Singh Film 83: अभिनेता रणवीर सिंग आजकाल 83 सिनेमाच्या तयारीमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी रणवीर सिंह खूप घाम गाळतोय.  सध्या रणवीर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये क्रिकेट प्रॅक्टिस करताना दिसतोय. तसंच रणवीर देखील मैदानावर खेळतानाचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असतो. 83 हा  सिनेमा १९८३ साली भारत आणि वेस्ट इंडिज या दोन टीममध्ये झालेला वर्ल्ड कपच्या सामन्यावर आधारित आहे.  यात रणवीर सिंग माजी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. सिनेमाची शूटिंग १५ मे रोजीपासून सुरू होणार आहे. तर १०० दिवस सिनेमाचं शूटिंग करण्यात येईल. अशातच रणवीरला कपिल देव यांच्या लूकमध्ये बघण्यासाठी त्याचे फॅन्स खूप उत्सुक आहेत. आता शूटिंग सुरू झालेली नाही आणि आताच आलेल्या माहितीनुसार 83 या सिनेमासाठी रणवीर सिंग हा पहिली पसंती नव्हती. 

समोर आलेल्या माहितीनुसार, रणवीर सिंग या सिनेमासाठी पहिली पसंत नव्हता. पिंकविला डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी पहिली पसंत अभिनेता रणदीप हुड्डा होता. रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी रणवीरच्या आधी रणदीप हुड्डाला ऑफर देण्यात आली होती. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा या सिनेमाचं डायरेक्शन संजय पूरण सिंग करत होते. 

एवढंच काय तर रणदीप संदर्भात अनाऊंसमेंटसोबत लूक टेस्ट देखील झालं होतं. मात्र काही कारणास्तव संजय पूरण सिंग या प्रोजेक्टमधून बाहेर पडले आणि कबीर सिंग यांच्याकडे हा सिनेमा आला. कबीर सिंग यांनी या सिनेमासाठी रणवीर सिंगची निवड केली आणि त्याला कास्ट केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

LEGEND! #KapilDev @83thefilm #blessed #journeybegins @kabirkhankk

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

83 सिनेमात रणवीर सिंग व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, चिराग पाटील, ताहिर भसीन, आर बद्री, हार्डी संधु, एमी विर्क आणि साहिल खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, कपिल देव यांच्या बायोपिकमधून त्यांची मुलगी अमिया देव देखील बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अमिया देव सिनेमात कबीर खानची असिस्टेंट म्हणून दिसेल. 83 हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये रिलीज केला जाईल. 

रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास 83 या सिनेमाचं शूटिंग झाल्यानंतर तो करण जोहरच्या तख्त सिनेमाचं शूटिंग करण्यास सुरूवात करेल. सिनेमात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट दिसेल. सिनेमात रणवीर आलिया व्यतिरिक्त विकी कौशल, करिना कपूर खान, भूमि पेडणेकर, अनिल कपूर आणि जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
83 सिनेमाची ऑफर रणवीरला नाहीतर या अभिनेत्याला होती Description: Ranveer Singh Film 83: रणवीर सिंगचा सिनेमा ८३ ची शूटिंग १५ मेपासून सुरू होणार आहे. या सिनेमाची शूटिंग १०० दिवस चालणार आहे. अशातच रणवीरचे फॅन्स त्याला कपिल देव यांच्या लूकमध्ये बघण्यात खूप उत्सुक आहेत.
Loading...
Loading...
Loading...