रामलिला दरम्यानचा रणवीर सिंगने शेअर केलेला पत्नी दीपिकासोबतचा थ्रोबॅक फोटो पाहिलात का?

बी टाऊन
Updated Oct 15, 2019 | 00:41 IST | चित्राली चोगले

बॉलिवडूचं पॉवर कपल रणवीर सिंग-दीपिका पदुकोण कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या सिनेमांसाठी, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी. अशीच त्यांची प्रोफेश्नल आणि पर्सनल आठवण जागी करणारा एक फोटो रणवीरने शेअर केलाय.

ranveer singh shares a funny throwback picture of himself with deepika padukone  from the sets of ramleela
रामलिला दरम्यानचा रणवीर सिंगने शेअर केलेला पत्नी दीपिकासोबतचा थ्रोबॅक फोटो पाहिलात का?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • रणवीर सिंगने केला पत्नी दीपिका पदुकोणसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर
  • 'गोलियों की रासलिला- रामलिला' सिनेमाच्या सेटवरच्या फोटोला दिलं धमाल कॅप्शन
  • दीपिकाने ही केली फोटोवर तोडीस तोड कमेंट

मुंबई: बॉलिवूडचं पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण त्यांच्या ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्रीसाठी कायम चर्चेत असतात. हे क्यूट कपल अनेकदा एकमेकांसोबत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो तर शेअर करतंच असतात पण त्याचसोबत अनेकदा एकमेकांना चिडवण्यासाठी किंवा एकमेकांची खेचण्यासाठी सुद्धा बऱ्याच पोस्ट करत असतात. हल्लीच दीपिकाने तिच्या शाळेच्या रिपोर्ट कार्डचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले. त्यावर रणवीरचे धमाल कमेंट तर बघण्यासारखे होते. तसंच त्याला दिलेला दीपिकाचा रिप्लाय सुद्धा मजेशीर होता. असाच एक थ्रोबॅक फोटो रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

रणवीरने शेअर केलेला फोटो आहे या पॉवर कपलच्या पहिल्या-वहिल्या एकत्रीत सिनेमाच्या सेटवरचा. गोलियों की रासलिला- रामलिला सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेचा हा फोटो असून रणवीर त्यात खूपंच बिचारा दिसत आहे. सिनेमाच्या सेटवर शूटच्यामध्ये ब्रेक असतानाचा हा फोटो आहे असं दिसतं. त्यात रणवीर दीपिकाच्या मागे बसून तिला एकटक पाहताना दिसतो, ज्याकडे दीपिकाचं अजिबात लक्ष नाही आहे. हा फोटो शेअर करत रणवीरने त्याला एक धमाल कॅप्शन दिलं आहे. तो या पोस्टमध्ये म्हणतो की या फोटोला कॅप्शन द्याची अजिबातंच गरज नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No caption needed ? @deepikapadukone #RamLeela

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरने शेअर केलेला हा थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर भलताच गाजतो आहे. त्याच्या या फोटोला फक्त त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर २४ लाखांच्या वर लाईक्स आले आहेत. तसेच या फोटोवर एकापेक्षा एक धमाल कमेन्ट्स सुद्धा येत आहेत. पण या सगळ्या कमेन्ट्समध्ये सगळ्यात भारी ठरली ती खुद्द दीपिकाची कमेंट. दीपिकाने फोटोवर केमेंट केलं आहे, ज्यात ती म्हणते, की सात वर्ष झाली आणि काहीही बदलेलं नाही आहे. त्यासोबत तिने एक क्यूट हार्ट इमोजी पण वापरला आहे आणि हॅशटॅग टाकत आईज ऑन मी, आईज ऑन यू असं लिहीलं आहे.

तब्बल ७ वर्षांपूर्वी याच गोलियों की रासलिला- रामलिला सिनेमात रणवीर-दीपिका एकत्र झळकले आणि तिथेच केमिस्ट्रीचा स्पार्क उडाला. याच सेटवर त्यांच्यात कुठेतरी प्रेम खुलू लागलं. पुढे या दोघांनी अनेक सिनेमे एकत्र केले मात्र हा सिनेमा या दोघांसाठी कायम खास राहील हे निश्चित. याच सिनेमाच्या दरम्यान सुरु झालेलं रणवीर-दीपिकाचं अफेअर ६ वर्ष सुरु राहीलं आणि अखेर गेल्या वर्षी हे दोघं १४ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. लवकरच या पॉवर कपलचा पहिला लग्नाचा वाढदिवस येणार आहे. त्यासाठी नक्कीच रणवीर आणि दीपिकाने एकमेकांसाठी असेच खास क्षण जपून ठेवले असतील हे नक्की.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी