Ranveer on Vijay Devarakonda: रणवीर सिंगने फॅशन सेन्सवरून उडवली 'या' अभिनेत्याची खिल्ली; म्हणाला, ''आताच बॅकस्टेजला चल आणि''

बी टाऊन
Updated Jul 22, 2022 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer on Vijay Devarakonda: रणवीर सिंगने (Ranveer Singh) फॅशन सेन्सवरून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाची ( Vijay Devarkonda ) खिल्ली उडवली. लायगर सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणवीरने विजयची त्याच्या कपड्यांवरून, चपलांवरून खिल्ली उडवली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही रणवीरच्या या वागणूकीवर संताप व्यक्त केला आहे.

Ranveer Singh taunted Vijay Devarkonda on his fashion sense liger promotion
रणवीर सिंगने उडवली विजय देवरकोंडाची खिल्ली  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रणवीर सिंगने उडवली विजय देवरकोंडाची खिल्ली
  • विजय देवरकोंडाच्या फॅशन सेन्सवरून उडवली खिल्ली
  • रणवीरच्या वागणूकीवर नेटकरी संतापले

Ranveer on Vijay Devarakonda: 'लायगर'सिनेमामुळे गेल्या काही दिवसांपासून विजय देवरकोंडा चर्चेत आहे. सिनेमाच्या पोस्टवरील त्याच्या न्यूडलूकने सोशल मीडियावर एकच धमाल उडवून दिली होती. त्यानंतर साऱ्यांनाच प्रतीक्षा होती ती सिनेमाच्या ट्रेलरची. अखेर 21 जुलै रोजी या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा हैदराबादमध्ये झाला. सिनेमाचा ट्रेलर धमाकेदार आहे. त्यानंतर सिनेमाची टीम मुंबईत दाखल झाली आहे. (Ranveer Singh taunted Vijay Devarkonda on his fashion sense liger praomotion )


मुंबईत या सिनेमाच्या प्रमोशनाला विजय देवरकोंडा  ( Vijay Devarkonda ), अनन्या पांडेसह (Ananya pandey) सिनेमाची टीम उपस्थित होती. अभिनेता रणवीर सिंगनेही (Ranveer Singh) या प्रमोशन सोहळ्याला हजेरी लावली. आपल्या हटके अंदाजात, हटके ड्रेसिंग स्टाईलमध्ये रणवीर सिंगने कार्यक्रमात एन्ट्री घेतली. मात्र, यावेळी बोलताना, 
रणवीरने विजय देवरकोंडाची त्याच्या फॅशन सेन्सवरून, ड्रेसिंग स्टाईलवरून खिल्ली उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Celebs Ark (@celebs.ark)

अधिक वाचा : लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त खास Marathi Messages


विजय देवरकोंडाने यावेळी काळा टी-शर्ट, कार्गो पँट आणि चपला घातलेल्या होत्या. ते पाहून रणवीर म्हणाला, “भाईची स्टाईल तर बघा. असं वाटतंय मी नाही तर हाच म्हणजे विजय देवरकोंडाच माझ्या ट्रेलर लाँच सोहळ्याला आला आहे.” इतकंच नव्हे तर रणवीरने त्याच्या चपलांच्या स्टाईलवरून त्याची तुलना जॉन अब्राहमशी देखील केली. विजयचं टी-शर्ट पाहून त्याला म्हणाला, "भाई हा टी-शर्ट मला हवा, चल आताच बॅकस्टेजला चल," विजय देवरकोंडानेही रणवीरने उडवलेल्या या खिल्लीला अगदी साध्या शैलीत उत्तर दिलं.

अधिक वाचा : महिना पूर्ण होण्याआधी रिकामा होतो तुमचा खिसा? करा हे ३ उपाय


मात्र, रणवीरचं हे वागणं त्याच्या चाहत्यांना, यूजर्सना अजिबात आवडलेलं नाही. अनेकांनी रणवीरच्या या वागण्यावर नाराजी दर्शवत, दाक्षिणात्यअभिनेत्यांकडून काही तरी शिका असा सल्लाही रणवीर सिंगला दिलेला आहे. तर काहींनी 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' असंही म्हटलं आहे. साऊथ दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर करण जोहरने सिनेमाची निर्मीती केलेली आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी