Ranveer Singh Fees for 83: रणवीर सिंगने '83'साठी घेतले तब्बल 20 कोटी, तर सिनेमाच्या प्रीमिअरला दीपिकाचा जलवा

बी टाऊन
Updated Dec 23, 2021 | 11:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer Singh and Deepika padukon : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 83 सिनेमा सिल्व्हर स्क्रीवर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा प्रीमिअर काल मुंबईत पार पडला. तर दुसरीकडेया सिनेमासाठी रणवीर सिंगने थोडेथोडके नाही तर तब्बल 20 कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे.

Ranveer Singh's '83' movie ready for release
रणवीर सिंगचा '83' सिनेमा रिलीजसाठी सज्ज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हा सिनेमा भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण विजयाची कथा आहे.
  • रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे
  • प्रीमिअरला दीपिका पुदकोणचा जलवा पाहायला मिळाला

Ranveer Singh Fees for 83: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) चा सिनेमा '83'  (Film 83) रिलीजसाठी  सज्ज आहे. कोरोना व्हायरसमुळे हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून रिलीजच्या प्रतीक्षेत होता. हा सिनेमा १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाच्या कथेवर आधारित आहे. कबीर खान ( Kabir khan ) दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ दाखवतो. सिनेमात कपिल देव ( Kapil Dev )यांची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे.

समीक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यावर रणवीर सिंगच्या कामााचं कौतुक केलं आहे.चित्रपटात रणवीर सिंग (Ranveer Singh) कुठेच दिसला नाही, तिथे फक्त कपिल देव दिसतो. रणवीरने कपिल देव यांची व्यक्तिरेखा खूप परफेक्शनने साकारली आहे असेच म्हणावे लागेल. आता या सिनेमासाठी रणवीर सिंगने  (Ranveer Singh) एवढी मेहनत घेतली असताना, त्यासाठी त्याने मोठी रक्कम घेतली असेल यात शंका नाही. 83 (Film 83)  या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंगने 20 कोटी रुपये घेतले असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. इतकंच नाही तर रणवीर सिंग 20 कोटींच्या फीसह चित्रपटाच्या नफ्यातही वाटा घेणार आहे. आमीर खान, सलमान खान, अक्षय कुमार यांसारखे अनेक स्टार्सही त्यांच्या चित्रपटांच्या नफ्यात वाटा उचलतात. 

(Deepika Padukone Look For Her Film 83 Premiere In Mumbai) या सिनेमाचा प्रीमिअर काल म्हणजेच बुधवारी मुंबईत पार पडला. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दिग्दर्शक कबीर खान ( Kabir khan ) स्पॉट झाले होते. रणवीर सिंग फॉर्मल व्हाईट सूट घालून प्रीमियरसाठी रेड कार्पेटवर दाखल झाला, तर दीपिका पदुकोण ( Deepika Pdaukon ) एका सुंदर गाऊनमध्ये दिसली.

गौरी आणि नैनिकाने दीपिकाचा हा आऊटफिट स्टाईल केला होता. दीपिकाने हा सुंदर हिरवा गाऊन साध्या नेकलेससह वेअर केला होता. दीपिका पदुकोणच्या आउटफिटसोबतच तिची हेअरस्टाईलही लोकांना आवडली आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटियाच्या भूमिकेत दिसणार आहे.


हे दिग्गज खेळाडू प्रीमियरला पोहोचले

बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह अनेक खेळाडूंनी प्रीमिअरला हजेरी लावली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

केवळ रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक कबीर खानच नाही तर प्रीमियरमध्ये 1983 च्या विश्वचषकादरम्यान भारताचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज खेळाडू देखील दिसले. कपिल देव, बलविंदर सिंग संधू, सय्यद किरमाणी, संदीप पाटील, सुनील गावसकर आणि इतर दिग्गज खेळाडू या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान दिसले. 


सिनेमात फारुख इंजिनिअरच्या भूमिकेत बोमन इराणी, व्यवस्थापकाच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी, गावस्करच्या भूमिकेत ताहिर भसीन, श्रीकांतच्या भूमिकेत तमिळ अभिनेता जीवा, महेंद्र अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम, जतिन सरना यांच्या भूमिकेत आहेत. यशपाल, मदन लालच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर संधूच्या भूमिकेत एमी विर्क दिसणार आहे


दिल्लीत सिनेमा करमुक्त


या सिनेमाच्या आगाऊ बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी (19 डिसेंबर) चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली आणि काही मिनिटांतच 15 हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली. या ट्रेंडनुसार, आगाऊ तिकिटांमधूनच चित्रपट 10 कोटींहून अधिक कमाई करेल. त्याच वेळी, दिल्ली सरकारने मंगळवारी 21 डिसेंबर 2021 रोजी जाहीर केले की दिल्लीत '83' करमुक्त करण्यात आला आहे.दिल्ली सरकार या चित्रपटावर कोणताही करमणूक कर आकारणार नाही, त्यामुळे तिकीट इतर चित्रपटांच्या तुलनेत खूपच स्वस्त असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी