83 trailer out: रणवीर सिंगने कपिल देवच्या व्यक्तिरेखेने मन जिंकले, 83 चा धमाकेदार ट्रेलर

83 trailer out: नवी दिल्ली: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, बहुप्रतिक्षित चित्रपट '83' च्या निर्मात्यांनी भारताच्या प्रतिष्ठित क्रिकेट सामन्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. रणवीर सिंग कपिल देव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे.

The long awaited 83 movie trailer release
बहुप्रतिक्षीत '83' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अखेर '83' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
  • रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत
  • 24 डिसेंबरला चित्रपट रिलीज होणार


83 trailer out: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर '83'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. अंडरडॉगची अविश्वसनीय सत्य कथा 24 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट 1983 च्या विश्वचषक विजयाभोवती फिरतो. भारताने हा विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. प्रत्येक भारतीयाचं स्वप्न त्यावेळी माजी कर्णधार कपिल देव यांच्या टीमने पूर्ण केले होते. ट्रेलर पाहून रणवीर सिंगने साकारलेल्या कपिल देव यांच्या व्यक्तिरेखेने मन जिंकलंय. 

रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर कपिल देव यांच्या पत्नी रोमीची भूमिका दीपिका पदुकोण साकारत आहे.


83 हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 24 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा चित्रपट 3D मध्ये देखील रिलीज होणार आहे. कमल हसनच्या राजकमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि अक्किनेनी नागार्जुनच्या अन्नपूर्णा स्टुडिओने चित्रपटाच्या तामिळ आणि तेलुगू आवृत्ती सादर करण्यासाठी रिलायन्स एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे.


पृथ्वीराज आणि किच्चा मल्याळम आणि कन्नडमध्ये सुदीपाचा शालिनी आर्ट्स 83 हा सिनेमा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. दीपिका पदुकोण, कबीर खान, विष्णू वर्धन इंदुरी, साजिद नाडियादवाला, फँटम फिल्म्स, रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी