Ranveer vs Wild with Bear Grylls: रणवीर सिंगने खाल्ले कीटक-डुकराचे मांस, बेअर ग्रिल्सही पाहून हसले, पाहा हा व्हिडिओ

बी टाऊन
Updated Jul 08, 2022 | 15:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ranveer vs Wild with Bear Grylls: रणवीर vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स (Ranveer vs Wild with Bear Grylls) या शोचा एक टीझर समोर आला आहे ज्यामध्ये रणवीर सिंग ( Ranveer Singh )किडे आणि रानडुकराचे मांस खाताना दिसत आहे. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ खूपच मजेदार दिसत आहे. बेअर ग्रिल्स रणवीरला कीटक दाखवतो आणि नंतर त्याला खायला देतो. हे खाताना रणवीर सिंगचा चेहरा पाहण्यासारखा आहे. बेअरही त्याच्यावर हसत आहे.

Ranveer vs Wild with Bear Grylls teaser, Ranveer ate insect-pork, Bear Grylls laughed, watch this video
रणवीर vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स शोमध्ये दिसणार रणवीर सिंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Ranveer vs Wild with Bear Grylls या स्पेशल शोमध्ये रणवीर सिंग दिसणार आहे
  • बेअर ग्रिल्ससोबत करणार जंगल अँडव्हेंचर
  • रणवीर सिंगला खावं लागतंय किटक आणि रानडुकराचे मांस

Ranveer vs Wild with Bear Grylls: रणवीर vs वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स (Ranveer vs Wild with Bear Grylls) या शोचा एक टीझर समोर आला आहे 
ज्यामध्ये रणवीर सिंग ( Ranveer Singh )किडे आणि रानडुकराचे मांस खाताना दिसत आहे. रणवीर सिंगचा हा व्हिडिओ खूपच मजेदार दिसत आहे. बेअर ग्रिल्स रणवीरला कीटक दाखवतो आणि नंतर त्याला खायला देतो. हे खाताना रणवीर सिंगचा चेहरा पाहण्यासारखा आहे. बेअरही त्याच्यावर हसत आहे.


रणवीर सिंग लवकरच नेटफ्लिक्सच्या स्पेशल शो Ranveer vs Wild with Bear Grylls मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये रणवीर बेअर ग्रिल्ससोबत जंगलात साहस करायला जाणार आहे. हे साहस करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यासोबतच कीडे, कीटक, जंगली श्वापदांचे मांसही खावे लागणार आहे. 

हा शो संवादात्मक असणार आहे. रणवीर सिंग शोमध्ये प्रत्येक टप्प्यावर प्रेक्षकांना प्रश्न विचारणार आहे. कीटक आणि डुकरांचे मांस खाण्यापूर्वीच रणवीर प्रेक्षकांना प्रश्न विचारताना  दिसत आहे. टीझरमध्ये तो म्हणतो की, "तुमचे म्हणजेच प्रेक्षकांचे उत्तर जे असेल तेच मी करेन."रणवीरचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहात आहेत. यापूर्वी अक्षय कुमार आणि रजनीकांत बेअर ग्रिल्ससोबत अॅडव्हेंचरवर आले आहेत. पण रणवीर सिंगच्या स्टाईलमुळे हा शो पूर्णपणे वेगळा असणार आहे. हा शो 8 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे. 


करण जोहरच्या शोमध्ये केली धमाल

रणवीर सिंग यापूर्वी कॉफी विथ करण 7 च्या पहिल्या भागातही दिसला होता. तो आलिया भट्टसोबत शोमध्ये पोहोचला होता. या एपिसोडमध्ये रणवीर सिंगने त्याचे सेक्स लाईफ, लग्न, चित्रपट आणि मित्रांबद्दल सांगितले. एवढेच नाही तर उर्फी जावेदच्या ड्रेसिंग सेन्सवरही त्याने कमेंट केली. 

प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग सर्कस या चित्रपटात दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत आहे.याशिवाय करण जोहरच्या रॉकी आणि रानी की कहानी या सिनेमातही दिसणार आहे.यामध्ये आलिया भट्ट त्याची हिरोईन असणार आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमीयांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी