Rashmika House Inside Photos: अवघ्या 4 वर्षात नॅशनल क्रश बनली रश्मिका मंदान्ना, पहा तिच्या घराची झलक

बी टाऊन
Updated Jan 15, 2022 | 15:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rashmika Mandanna Net Worth: साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या चार वर्षात नॅशनल क्रश बनली आहे तिने फिल्मी दुनियेत (Rashmika Mandanna Movie) घवघवीत यश मिळवले आहे. या चार वर्षात तिने नावासोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे.

Rashmika Mandanna's Net Worth
रश्मिका मंदान्नाकडे आहे अमाप संपत्ती  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • रश्मिका मंदान्नाकडे आहे अमाप संपत्ती
  • अवघ्या 4 वर्षात रश्मिका मंदान्नाने कमावली 30 कोटींची संपत्ती
  • पुष्पा सिनेमातील रश्मिकाच्याही कामाचं कौतुक

Rashmika Mandanna Net Worth: साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) गेल्या चार वर्षात नॅशनल क्रश बनली आहे तिने फिल्मी दुनियेत (Rashmika Mandanna Movie) घवघवीत यश मिळवले आहे.या चार वर्षात तिने नावासोबतच भरपूर संपत्तीही कमावली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही रश्मिकाची जबरदस्त फॅन फॉलोइंग पाहायला मिळते. जरी तिने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. तिच्या नेट वर्थबद्दल जाणून घेऊया.

रश्मिका मंदान्नाने २०१६ साली किरिक पार्टी या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पहिल्याच चित्रपटापासून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

रश्मिकाने तिच्या सुंदर दिसण्याने, आणि दमदार अभिनयाने यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. रश्मिकाकडे एकापेक्षा एक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदान्ना एका चित्रपटात काम करण्यासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेते.


रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना हिच्याकडे 30 कोटींची संपत्ती आहे. लक्झरी कार आणि आलिशान व्हिला देखील आहे, जो बंगळुरूमध्ये आहे, त्याची किंमत 8 कोटी आहे.


रश्मिका मंदान्नाकडे अनेक आलिशान वाहने आहेत. तिच्याकडे ५० लाखांची मर्सिडीज बेंझ सी-क्लास, ४० लाखांची ऑडी क्यू३, टोयोटा इनोव्हा आणि ह्युंदाई क्रेटा आहे. 

Rashmika Mandanna thanks all her fans for swanky-new Range Rover | Kannada  Movie News - Times of India
रश्मिकाचे बंगळुरूशिवाय गोव्यातही आलिशान घर आहे. याशिवाय अभिनेत्रीचा हैदराबादच्या गची बाओलीमध्ये एक कोटींचा बंगला आहे.


रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत 11 चित्रपट केले आहेत. तिच्या शानदार चित्रपट कारकिर्दीच्या जोरावर ती अनुष्का शेट्टीलाही स्पर्धा देते.

वर्कफ्रंटबदल बोलायचे झाले तर, नुकताच रश्मिकाचा पुष्पा रिलीज झाला, या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये खूप चर्चा आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी