Karva Chauth: करवा चौथ आणि महिलांवर अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर खळबळ

Ratna Pathak Controversy Karva chauth: अभिनेत्री रत्ना पाठक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये महिलांसाठी करवा चौथचा उपवास सनातनी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यावरुन आता त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

ratna pathak gave a controversial statement on fasting of women on karva chauth there was a ruckus on social media
करवा चौथ आणि महिलांवर अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान (प्रातिनिधिक फोटो, Getty Images) 
थोडं पण कामाचं
  • रत्ना पाठक यांनी करवा चौथ आणि महिलांचा उपवास याबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य
  • या वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्रीला केले जात आहे ट्रोल
  • भारत एक पुराणमतवादी देश बनत आहे, रत्ना पाठक यांचं वक्तव्य

Ratna Pathak Controversy Karva Chauth: मुंबई: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठकने (Ratna Pathak) तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण अभिनेत्री रत्ना पाठक तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, रत्ना पाठकने आधुनिक महिलांच्या रूढीवादी विचारसरणी आणि करवा चौथ (Karva Chauth) साजरे करण्याबाबत एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले आहे. ज्यानंतर अनेक जण तिला सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड ट्रोल करत आहेत. रत्ना यांनी करवा चौथला अंधश्रद्धा आणि सनातनी म्हणत भारतीय महिलांची खिल्ली उडवली आहे. (ratna pathak gave a controversial statement on fasting of women on karva chauth there was a ruckus on social media)

रत्ना पाठकने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला कोणीतरी मागच्या वर्षी विचारले होते की ती आपल्या पतीच्या आरोग्यासाठी करवा चौथ उपवास करते की नाही. यावर उत्तर देताना ती म्हणाली की, 'मी काय वेडी आहे का, जे असं काही करेल.'

अधिक वाचा: Karwa Chauth 2021 Upay: आज करवा चौथच्या दिवशी करा फक्त हे 2 उपाय, वैवाहिक जीवनातील अडचणी होतील दूर

'करवा चौथ म्हणजे परंपरावादी'

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'सुशिक्षित आधुनिक महिलाही करवा चौथचा उपवास ठेवतात हे फार विचित्र आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्या उपवास करतात. जेणेकरून त्याला स्वतःच्या जीवनात वैधता प्राप्त होईल.' 

अधिक वाचा: करवा चौथच्या दिवशीच पतीने कापली पत्नीची जीभ, कारण समजल्यास तुम्हालाही बसेल धक्का

'भारतातील विधवा महिलांची स्थिती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे स्त्रिया  विधवा होऊ नये यासाठी जे काही शक्य आहे ते सर्व करतात. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित महिलांचीही अशीच विचारसरणी आहे जी आपल्याला अधिक परंपरावादी बनवत आहे.' असं रत्ना पाठक यावेळी म्हणाली.

रत्ना यांनी भारताची तुलना केली सौदी अरेबियाशी 

रत्ना पुढे म्हणाली की, 'पुराणमतवादी समाजाला आधी आपल्या महिलांना दडपायचे असते. याचा सर्वाधिक परिणाम फक्त महिलांवर होतो. सौदी अरेबियामध्ये महिलांना काय वाव आहे? आता भारत देखील एक पुराणमतवादी समाज बनत आहे आणि आगामी काळात आपला देश सौदी अरेबिया होईल असे वाटते.' असं मत रत्ना पाठकने व्यक्त केलं आहे.

अधिक वाचा: अशी साजरी केली प्रियांका चोप्राने पती नीक जोनाससोबत साता समुद्रापार पहिली-वहिली करवा चौथ

'लोक धर्मगुरूंच्या मागे लागले आहेत'

आजच्या काळातील प्रचाराबद्दल रत्ना म्हणाली की, 'जाहिरातींमध्येही कुंडली, वास्तू आणि ज्योतिष दाखवले जातात. लोक धर्मगुरूंच्या मागे लागले आहेत. नित्यानंद पहा, त्यांनी कुठेतरी एक बेट बनवले आहे. असे अनेक धर्मगुरू आहेत. याला आधुनिक समाज म्हणतात का?' असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी