वडिलांची इच्छा होती मुलाने दूध विकावे, आईकडून ५०० रूपये घेऊन पळून आले होते मुंबईला

बी टाऊन
Updated Apr 16, 2019 | 09:42 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Loksabha election 2019: रवी किशन यांना भाजपने गोरखपूर येथून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. १९९०मध्ये जेव्हा रवी किशन गाव सोडून मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याकडे न खाण्यासाठी पैसे होते ना राहण्यासाठी जागा.

ravi kishan
रवी किशन 

मुंबई : भोजपुरी सिनेमांचा सुपरस्टार रवी किशन लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढतो आहे. रवी किशनला भाजपने गोरखपूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. रवी किशनने याआधी २०१४मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर जौनपूर येथून निवडणूक लढवली होती. रवी किशन यांना भोजपुरी सिनेमातील अमिताभ बच्चन म्हटले जाते. रवी किशन यांनी करिअरच्या सुरूवातीला खूप संघर्ष केला होता. रवी किशन यांच्याकडे सुरूवातीला खाण्यासाठीही पैसे नव्हते. रवी किशन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की माझ्या वडिलांचा डेअरची बिझनेस होता. तो काही कारणामुळे बंद झाला. त्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती हा बिझनेस पुन्हा सुरू व्हावा. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Kishan (@ravikishann) on

रवी किशन यांच्या मते माझे वडील मला नेहमी सल्ला देत की आपली एनर्जी चांगल्या कामांसाठी वाचवून ठेव. मुलींच्या मागे धावू नकोस. नेहमी एकाच महिलेशी प्रामाणिक राहा. पुरुष सेक्स वर्कर बनू नकोस. रवी किशन म्हणाले, जर माझ्या वडिलांनी मरा मारले नसते तर मी ड्रग अॅडिक्ट झालो असतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravi Kishan (@ravikishann) on

रामलीलामध्ये केली सीतेची भूमिका

रवीने एका मुलाखतीत सांगितले की त्यांना अभिनयाची आवड होती. यातच गावातील रामलीलामध्ये ते सीतेची भूमिका करत असतं. दरम्यान, त्यांच्या वडिलांना हे अजिबात आवडत नव्हते. एकदा वडिलांनी त्याला पट्ट्याने मारले होते. वडिल म्हणाले होते, हे काय नाचगाणे करतोय. एके दिवशी आईने माझ्या हातात ५०० रूपये ठेवले आणि म्हणाली घरातून पळून जा. त्यानंतर रवी किशनने गाव सोडून मुंबईला आले. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Gym time my time

A post shared by Ravi Kishan (@ravikishann) on


रिकाम्या पोटी जागवल्या रात्री

रवी किशन १९९०मध्ये गाव सोडून मुंबईला आले होते. मुंबईमध्ये त्यांच्याकडे डोक्यावर छप्परही नव्हते. रवी किशन दोनवेळचे जेवण मिळवण्यासाठी काम शोधत राहायचे. अनेक रात्री त्यांना भुकेल्या पोटी झोपावे लागले. याशिवाय त्यांच्याकडे बसचे तिकीट काढण्यासही पैसे नव्हते. काही पैसे कमावल्यानंतर ते दोन रुपयांचा वडापाव खाऊन झोपी जात. 

रवी यांना १९९१मध्ये पितांबर या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही जास्त चालला नाही. रवी किशनने १९९६मध्ये शाहरूख खानचा सिनेमा आर्मीमध्ये काम केले होते. रवी किशन यांना खरी ओळख २००३मध्ये आलेल्या सलमान खानचा सिनेमा तेरे नाममधून मिळाली. रवी किशन आज एका सिनेमासाठी ५० लाख रूपये फी घेतात.

अशी होती लव्हस्टोरी

रवी किशन यांनी १९९६मध्ये प्रीती किशन यांच्याशी लग्न केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार रवी आणि प्रीती यांची भेट ११वीत असताना झाली होती. ११वीत असताना रवी किशन आणि प्रीती यांचे सूत जुळले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
वडिलांची इच्छा होती मुलाने दूध विकावे, आईकडून ५०० रूपये घेऊन पळून आले होते मुंबईला Description: Loksabha election 2019: रवी किशन यांना भाजपने गोरखपूर येथून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. १९९०मध्ये जेव्हा रवी किशन गाव सोडून मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याकडे न खाण्यासाठी पैसे होते ना राहण्यासाठी जागा.
Loading...
Loading...
Loading...