Ravi Kishan Daughter : रवी किशनच्या मुलीला अग्निपथ योजनेत सैन्यात भरती व्हायचंय,चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

बी टाऊन
Updated Jun 21, 2022 | 22:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ravi Kishan Daughter :रवी किशनने त्यांची मुलगी इशिता शुक्लाच्या हातात NCC कॅडेटचे प्रमाणपत्र घेतलेला फोटो शेअर केला आहे. रवी किशनने लिहिले की, माझी मुलगी इशिता आज सकाळी म्हणाली – बाबा, मला अग्निपथ आर्मी रिक्रूटमेंट स्कीममध्ये सामील व्हायचे आहे. हे ऐकून मी तिला पुढे जाण्यास सांगितले.

Ravi Kishan's daughter wants to join army in Agneepath scheme
रवी किशनच्या मुलीला अग्निपथ योजनेतून व्हायचंय सैन्यात भरती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रवी किशनच्या मुलीला सैन्यात भरती व्हायचे आहे
  • अग्निपथ योजनेतून सैन्यात भरती व्हायचे आहे
  • अभिनेता रवी किशनचा मुलीला पाठिंबा,चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव

Ravi Kishan Daughter : केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे. आता या योजनेतूनच सैन्य भरती होणार आहे. या योजनेला पाठिंबा देत भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीलाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांची मुलगी इशिता हिला अग्निपथ योजनेतून सैन्यात भरती व्हायचे आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. रवी किशन हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भोजपुरी अभिनेते आहेत. 
त्यांनी मुलीचा फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे की, त्यांच्या मुलीलाही अग्निपथ योजनेतून सैन्यात भरती व्हायचे आहे.

रवी किशनने त्यांच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिच्याकडे एनसीसी कॅडेट प्रमाणपत्र आहे. रवी किशनने लिहिले, 'माझी मुलगी इशिता आज सकाळी म्हणाली - पापा, मला अग्निपथ आर्मी रिक्रूटमेंट स्कीममध्ये सामील व्हायचे आहे. हे ऐकून मी तिला पुढे जाण्यास सांगितले.मोदी सरकारने नुकतीच घोषणा केली की, अग्निपथ योजनेंतर्गत सैनिकांची नियुक्ती ४ वर्षांसाठी केली जाईल. त्यानंतर ७५ टक्के सैनिकांना घरी पाठवले जाईल, तर उर्वरित सैनिकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाईल. सोशल मीडियावर या योजनेच्या समर्थन आणि विरोधात ट्विट केले जात आहे.


रवी किशनच्या या ट्विटवर युजरने खूप कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, 'बरोबर आहे, निवृत्तीनंतर तुमच्या मुलीला कोणतीही कमतरता भासणार नाही. दुसर्‍याने लिहिले, “लाखो तरुणांचा विचार करा जे वयाच्या २४-२५ व्या वर्षी निवृत्त होतील. एका यूजरने म्हटले की, 'जेव्हा इशिताचे ट्रेनिंग होईल, तेव्हा ट्विट करू.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी