Disha Patani ने या कारणामुळे केलं टाईगर श्रॉफ सोबत ब्रेकअप! समोर आलं हे खरं कारण

बी टाऊन
Updated Mar 17, 2023 | 16:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Disha-Tiger Break Up: दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफ च्या अफेयर ची एकेकाळी खूप चर्चा व्हायची.  मात्र, अचानक या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. त्यांच्या या अधुरी प्रेमकहाणी चे नेमके कारण आपण आज जाणून घेणार आहोत.  

ऑनस्क्रीन देखील या जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. 
दिशा आणि टाइगर ऑन स्क्रिन बागी २ मध्ये एकत्र दिसून आले होते.   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफच्या अफेयरवर मोठी अपडेट
  • जॅकी श्रॉफ यांचा मोठा खुलासा
  • दिशा आणि टाइगरच्या लग्नावर वक्तव्य

Disha-Tiger Break Up : दिशा पटानी आणि टाइगर श्रॉफ ६ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. मात्र, या दोघांनी कधीच आपले रिलेशनशिप अधिकृत जाहीर केले नव्हते. दिशा नेहमी टाइगरची बहिण कृष्णा श्रॉफ बरोबर दिसून यायची. मात्र, अचानक कळलेल्या ब्रेकअपच्या बातमीमुळे या जोडीच्या चाहत्यांना धक्काच बसला. (Real Reason came out Behind Disha and Tigers Break up )

हे पण वाचा  : OnePlus प्रेमींसाठी Amazonची खास ऑफर, जाणून घ्या कसा मिळवायचा डिस्काऊंट

एका सूत्राच्या अहवालानुसार, या दोघांच्या एका मित्राने सांगितले की, दिशा टाइगर सोबत लग्न करू इच्छित होती, मात्र  टाइगर त्यासाठी सध्या तयार नव्हता. याच कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाले होते.  दिशा आणि टाइगरच्या लग्नावरून जैकी श्रॉफ यांनी देखील वक्तव्य केलं होत.  पत्रकारांशी बोलताना मार्च २०२२ मध्ये जॅकी यांनी टाइगरचा इतक्या लवकर लग्न करण्याचा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं होत. तसेच, टाइगर ने त्याच्या कामासोबत लग्न केलं असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं होतं. 

हे पण वाचा :  येत आहे देशातली सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार

यादरम्यान जॅकी यांनी टाइगर आणि दिशाच्या ब्रेकअप वर देखील मत मांडलं होतं.  एका मुलाखतीत जॅकी यांनी म्हंटले, "दोघांना एकत्र राहायचे की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्यांची ती लव्ह स्टोरी आहे. जशी माझी आणि माझी पत्नी आयशाची लव्हस्टोरी आहे!"

दिशा आणि टाइगर ऑन स्क्रिन बागी २ मध्ये एकत्र दिसून आले होते. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांनी चांगलेच पसंत केले होते. सध्या टाइगर श्रॉफ कामात व्यस्त असून, त्याचे लागोपाठ अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्याचे ‘स्क्रू ढीला’, ‘बड़े मियां छोटे मियां’ आणि ‘गणपत पार्ट 1’  हे चित्रपट आहेत. 

दिशा 'एक विलेन रिटर्न्स' मध्ये दिसून आली होती. ज्यात तिने तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर सारख्या कलाकारांसोबत काम केलं होतं.  आता लवकरच दिशा योद्धा मध्ये दिसून येणारं आहे.  ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच दिशा चा  'प्रोजेक्ट के' देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी