Reena Roy daughter : रीना रॉयची मुलगी सनम खानच्या सौंदर्यापुढे स्टार किड्सही फिके,फोटो झाला व्हायरल

बी टाऊन
Updated Jul 22, 2022 | 18:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Reena Roy daughter : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये रीना रॉय तिची मुलगी सनम खानसोबत दिसत आहे. रीना रॉयची मुलगी सनम खान सौंदर्याच्या बाबतीत तिच्या आईपेक्षा काही कमी नाही. एवढंच नाही तर तिच्या या सौदर्यापुढे बॉलिवूडचे स्टार किड्सही फिके पडत आहेत.

Reena roy's daughter sanam khan
सनम खानच्या सौदर्यापुढे स्टार किड्सही फिके  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सनम खान अभिनेत्री रीना रॉय यांची मुलगी
  • सनम खानच्या सौदर्यापुढे बॉलिवूड स्टार किड्सही फिके
  • सनम खान आणि रीना रॉय यांचा फोटो व्हायरल

Reena Roy daughter : रीना रॉय  (Reena Roy) 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. रीना रॉयने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रीना रॉय त्यांच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत होत्या. एकेकाळी रीना रॉयचे नाव बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतही जोडले गेले होते. दोघांनी 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यापैकी 9 हिट ठरले होते. पण एक वेळ अशी आली की त्यांनी बॉलिवूडचे हे झगमगतं जग सोडून देण्याचा विचार केला. संसार थाटण्याचा विचार केला. रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केले. लग्नानंतरही शत्रू आणि रीनाच्या अफेअरच्या बातम्या येतच होत्या. शत्रुघ्न सिन्हा यांची एकुलती एक मुलगी सोनाक्षी सिन्हा बद्दल असेही म्हटले जात होते की ती रीना रॉयची मुलगी आहे. मात्र, हे सर्व खोट असून  मोहसीन खान आणि रीना रॉय यांना सनम खान नावाची मुलगी आहे. सनम खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ( Reena roy's daughter sanam khan's glamorous look gives competition to star kids photos viral)

अधिक वाचा : मर्यादेपेक्षा जास्त हळदीचे सेवन देऊ शकते या आजारांना आमंत्रण

1976 मध्ये रीना रॉयचा समावेश बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत झाला होता. बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ घालवल्यानंतर रीना रॉय यांनी 1983 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले. काही काळानंतर या जोडप्याला एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी सनम ठेवले. सध्या सोशल मीडियावर सनम खानचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की रीना रॉयची मुलगी सनम खान सौंदर्याच्या बाबतीत तिच्या आईपेक्षा कमी नाही.

Meet Reena Roy's daughter Sanam Khan whose picture has gone viral on internet | Hindi Movie News - Bollywood - Times of India

 फोटोमध्ये सनम पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि हाय पोनी टेलमध्ये दिसत आहे. सनमचा हा फोटो समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. फोटोवर कमेंट करताना एका सोशल मीडिया युजर्सने लिहिले आहे की, “Where was you the charmer”. तर दुसर्‍याने लिहिले, "आई अधिक सुंदर आहे".

अधिक वाचा : स्मार्टफोन झटपट चार्ज करायचाय? मग फॉलो करा या सोप्या टिप्स


रीना रॉयने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी 'नागिन', 'जैसे को तैसा','जख्मी' आणि 'कालीचरण' सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. 1976 पर्यंत, रीना रॉय त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी