Sonam Kapoor : मावशी रेहा कपूरने भाच्याचे असे केले स्वागत, "Welcome Baby Kapoor"

बी टाऊन
Updated Aug 27, 2022 | 13:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonam Kapoor and Anand Ahuja welcome baby boy सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Aahuja) यांच्या घरी 20 ऑगस्ट रोजी बाळाचा जन्म झाला. सोनम आणि आनंद आहुजा आपल्या मुलासह शुक्रवारी अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले.यावेळी मावशी रेहा कपूरने खास अंदाजात भाचाचे स्वागत केले.

Reha kapoor welcome Sonam and Anand ahuja baby boy at home
सोनम कपूरचे बाळासह अनिल कपूरच्या घरी जंगी स्वागत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनम कपूरचे बाळासह अनिल कपूर यांच्या घरी जंगी स्वागत
  • बाळाच्या वेलकमसाठी घरात फुले आणि फुग्यांची सजावट
  • इंस्टाग्राम स्टोरीवर रेहाने शेअर केले फोटोज आणि व्हिडिओज

Sonam Kapoor and Anand Ahuja welcome baby boy : सोनम कपूर (Sonam Kapoor ) आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) आणि त्यांच्या बाळाचे अनिल कपूर आणि संपूर्ण कुटुंबाने घरी स्वागत केले. अनिल आणि आनंद यांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधीनांही  मिठाई वाटली.तर मावशी रेहा कपूरने खास अंदाजात भाचाचे स्वागत केले. मावशी झाल्याने रेहाचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं याआधीच रेहाने इंस्टापोस्टवर म्हटले होते. ( Reha kapoor welcome Sonam and Anand ahuja baby boy at home)

अनिल कपूर यांच्या घरी बाळाचं जंगी स्वागत करण्यात आलं. घरा फुलांची आणि फुग्याची सजावट केलेली होती. फुग्यांवर 'बेबी कपूर आहुजा' असे लिहिलेले होते. हे सर्व मावशी रेहा कपूरने तिच्या इंस्टास्टोरीवर शेअर केलेले आहे. 'द लायन किंग'मधील 'आय जस्ट कान्ट वेट टू बी किंग' हे गाणे तिने वापरले आहे. व्हिडिओसोबत रियाने लिहिले, "आमच्या सिम्बाचे घरात स्वागत आहे!" असे म्हटले आहे.

अधिक वाचा : "रंग है गुलाबी.." म्हणत कपिल शर्माचा न्यू लूक

काही दिवसांपूर्वी सोनमची बहीण रेहा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या भाच्याचा फोटो शेअर केला. "फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये रेहा कपूरने लिहिले की, 'रेहा मावशीचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे . तू खूप गोंडस आहेस. हा क्षण स्वप्नासारखा आहे. आई सोनम कपूर, वडील आनंद आहुजा. नवीन आजोबा आणि आजी अनिल कपूर आणि सुनीता कपूर सगळ्यांकडून खूप खूप प्रेम."आनंदनेही आपल्या मुलाच्या पहिल्या झलकवर प्रतिक्रिया दिली होती. एकूणंच काय तर सध्या नाना अनिल कपूर आणि नानी सुनिता कपूरसह साऱ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झालाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

अधिक वाचा : सुधीर सांगवान हा सोनाली फोगाट यांचा पती की पीए

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली होतीएका सोशल मीडिया पोस्टमध्ये, त्यांनी लिहिले की , "20.08.2022 रोजी, आम्ही आमच्या बाळाचे स्वागत केले. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबाचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, पण आम्हाला माहित आहे की आमचे आयुष्य कायमचे बदलले आहे. सोनम आणि आनंद."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी