मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या ( Sushant Singh Rajput )निधनाला साधरण दोन वर्ष उलटून गेली आहेत. परंतु आज या अभिनेत्या विषय निघाला की ही घटना आत्ताच घडली असं वाटतं. सुशांत सिंग राजपूतने करिअरच्या तणावाखाली असताना आत्महत्या केली होती. सुशांतने ज्या घरात गळफास घेतला होता. त्या घर मालकाला फ्लॅट (Flat) भाडेतत्त्वावर (lease) देणं मोठ्या जिकीरीचं झालं आहे. सुशांतच्या निधनाला दोन वर्ष झाली आहेत, तरीही नागरिकांना या घराची भिती वाटत असून कोणीही या फ्लॅटमध्ये राहण्यास उत्सुक नाही. (Residents are worried about the flat where Sushant Singh Rajput lives)
अधिक वाचा :विरोधकांच्या प्रश्नांनी हुडहुडी भरणार की तापमान वाढणार?
फ्लॅटला भाडेकरू मिळत नसल्याची माहिती आता समोर आली आहे. फ्लॅटच्या ब्रोकरने एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि सांगितले आहे की, हा फ्लॅट दरमहा 5 लाख रुपये भाड्याने उपलब्ध आहे. रफिक मर्चंट असे या ब्रोकरचे नाव असून त्याने या फ्लॅटचा फोटो ट्विट केलाय. दरम्यान या फ्लॅटचा मालक एनआरआय (Flat owner NRI)आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे येथे हा फ्लॅट आहे.
यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने दोन वर्षापूर्वी ल फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. या घटनेनंतर या घरमालकावर भाडेकरू मिळवण्याचं संकट आलं आहे. गेल्या अडीच वर्षापासून हा फ्लॅट रिकामा पडलाय,यात कोणी राहण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे. या घराची नागरिकांना भिती वाटत असल्याचं सांगितलं जात आहे. या फ्लॅटला भाडेकरू मिळावा यासाठी ब्रोकर रफिक मर्चंटने या फ्लॅटच्या वैशिष्ट्ये सांगत याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा फ्लॅट 5 लाख रुपयांनी भाड्याने मिळेल असं माहिती दिली आहे.
सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्याने नागरिकांना या घराची भिती वाटत आहे. आता याची धास्ती घरमालकाने घेतली असून घरमालक आता कोणत्याच बॉलिवूड कलाकाराला हा फ्लॅट भाड्याने देऊ इच्छित नाही. कोणी कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तीने हा फ्लॅट भाड्याने घ्यावा अशी इच्छा या घरमालकाची आहे. हा फ्लॅट 4 बीएचके असून याचे भाडे 5 लाख रुपये आहे. ब्रोकरने या फ्लॅटचा व्हिडिओ बनवला असून ट्विटमध्ये त्याचा फोन नंबर दिला आहे.
अधिक वाचा : मोराला पिल्लं कशी होतात? लांडोर अश्रू पिवून गर्भवती होते?
जॉगर्स पार्क, वांद्रे माँ ब्ला इमारतीमध्यील सर्वात शेवटच्या मजल्यावर हा डुप्लेक्स फ्लॅट आहे. या फ्लॅटमधून समुद्राचा पूर्ण नजारा येथून दिसतो. या फ्लॅटमध्ये एक हॉल , 4 बेडरुम आणि प्रशस्त किचन आहे. त्याला पुढे गच्ची आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनापासून हा फ्लॅट रिकामाच आहे. तेथे कोणीच राहायला तयार नाही. परंतु या फ्लॅटचे भाडे देखील लाखोंच्या घरात आहे. सामान्य माणूस तेथे भाड्याने राहण्याचा विचार करू शकत नाही. तसेच लोक या फ्लॅटमध्ये घाबरतात. ज्या फ्लॅटमध्ये अभिनेत्याचा मृत्यू झाला होता, त्याने आत्महत्या केली होती, हे जेव्हा भाडेकरूला समजतं तेव्हा ते भाडेकरू नकार देतात. सध्या तरी लोक फ्लॅट पाहण्यास येतात परंतु कोणीच भाडे करार करत नाही. याशिवाय घर मालकही भाडे कमी करण्यास तयार नाहीये, असे ब्रोकर रफिक मर्चंटने सांगितले आहे.
एमएस धोनीच्या बायोपिक 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांत सिंग राजपूतने भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. सुशांतच्या कारकिर्दीतील हा पहिलाच चित्रपट होता ज्याने शंभर कोटींची कमाई केली होती. याशिवाय त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'छिछोरे' या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती.