Rhea Video: रिया चक्रवर्तीनं सर्व आरोपांवर दिलं उत्तर, म्हणाली ‘मला न्याय मिळेल, सत्यमेव जयते'

Rhea Chakraborty on Allegation: अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं तिच्यावर लागलेले सर्व आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. रियानं म्हटलं, मला पूर्ण आशा आहे की, या प्रकरणात तिला योग्य न्याय मिळेल.

Sushant Singh Rajput and Rhea Chakravarty
रिया चक्रवर्तीनं तिच्यावरील सर्व आरोपांवर दिलं उत्तर  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं पहिल्यांदाच दिलं तिच्यावरील आरोपांवर उत्तर.
  • सुशांतचे कुटुंबीय तिला फसवत असल्याचा केला आरोप.
  • अखेर सत्याचाच विजय होईल असं म्हणत मी सध्या जास्त काही बोलणार नसल्याचं तिनं केलं स्पष्ट

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Suicide Case) आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण मिळतंय. सुशांतच्या कुटुंबियांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात (Rhea Chakraborthy) अनेक आरोप लावले असून बिहार पोलिसांकडे एफआयआर (FIR) दाखल केलीय. या सर्व आरोपांवर आता रिया चक्रवर्तीनं उत्तर दिलंय. रियानं एक व्हिडिओ (Shared Video) प्रसिद्ध करत आपलं उत्तर दिलं.

व्हिडिओमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं सांगितलं की, ‘मला देवावर आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला विश्वास आहे की, मला न्याय मिळेल. जरीही मीडियामध्ये माझ्या विरोधात अनेक वाईट बोललं जात आहे. मला त्याच्यावर कमेंट नाही करायची.’

रिया चक्रवर्ती या व्हिडिओत पुढे म्हणाली, ‘हे प्रकरण सध्या कोर्टात विचाराधीन आहे. अशात माझ्या वकीलांनी मला काहीही न बोलण्याचा सल्ला दिलेला आहे. सत्यमेव जयते. शेवटी सत्याचाच विजय होईल.’

५ ऑगस्टला होऊ शकते सुनावणी

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या एफआयआर विरोधात रिया चक्रवर्तीनं कोर्टात याचिका दाखल केलीय. सुप्रीम कोर्टात आता रिया चक्रवर्तीच्या या याचिकेवर ५ ऑगस्टला सुनावणी होऊ शकते.

आपल्याला माहितीच आहे २८ जुलैला रिया चक्रवर्तीनं तिचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यासह सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. त्यात बिहार पोलीसांत दाखल प्रकरण मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर करण्याची मागणी केलीय. मात्र रियाच्या वकीलांनी या केसवर लगेच सुनावणी करण्याची मागणी केलेली नाही.

याचिकेत म्हटलंय असं काही

रिया चक्रवर्तीनं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत सुशांतचे वडील आपल्याला फसवत असल्याचं म्हटलंय. तिचा सुशांतच्या आत्महत्येमध्ये कुठलाही सहभाग नाही. रियानं सांगितलं की, ती मागील एक वर्षापासून सुशांत सिंह राजपूतसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती.

रियानं आपल्या याचिकेत पुढे असंही म्हटलंय की, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांमागे काही शक्तीशाली लोकांचा हात आहे, जे मला फसवण्यासाठी त्यांना भडकवत आहे. याशिवाय काही लोकांना त्यांनी संपर्क केलाय, जे माझ्याविरोधात साक्ष देतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी