रिया चक्रवर्ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार, पाहा तिचा सिनेमा कधी होणार रिलीज

बी टाऊन
रोहित गोळे
Updated Jan 06, 2021 | 17:15 IST

Rhea Chakraborty ready to big screen: रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ती दिग्दर्शक रुमी जाफरीच्या चित्रपटात दिसणार आहे.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार!  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • रिचा चक्रवर्ती 'चेहरे' सिनेमातून करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन
  • या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी देखील दिसणार आहेत
  • या चित्रपटाचे दिग्दर्शक रूमी जाफरी आहेत.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी (Rhea Chakraborty) वर्ष 2020 खूप कठीण होते. गेल्या वर्षी रियाने तिचा प्रियकर सुशांतसिंग राजपूतच (Sushant Singh Rajput) गमावला नाही तर त्याच्या आत्महत्येसाठी देखील तिला अनेकांनी जबाबदार ठरवलं आहे. तिच्यावर तशा स्वरुपाचे आरोप देखील करण्यात आले आहेत. तथापि, रियाने या परिस्थितीचा अतिशय सक्षमपणे सामना केला. एवढेच नव्हे तर या प्रकरणी जेव्हा ड्रग्स अँगलने चौकशी सुरु झाली तेव्हा नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रियाला अटक करुन तुरूंगात पाठविले होते. तिने सुमारे १ महिना तुरूंगात घालविला. त्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली. सध्या ती जामिनावर बाहेर. दरम्यान, रिया आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) परतण्याची तयारी करत आहे. दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाद्वारे ती मोठ्या पडद्यावर पुनरागमन करेल.

'चेहरे' चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

रिया चक्रवर्तीचा 'चेहरे' हा चित्रपट 2021 मध्येच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रियासह बिग बी अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपट निर्माते रुमी जाफरी यांनी नुकतीच रिया चक्रवर्ती यांची भेट घेतली. यानंतर जाफरी म्हणाले की, रिया तिचा वाईट काळ मागे ठेवून सिनेसृष्टीत परतण्यास तयार झाली आहे. मिड-डेशी बोलताना ते म्हणाले, 'तुमच्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शूर बना असा सल्ला देईल, पण प्रत्यक्षात ते केवढं कठीण असतं हे फक्त त्यालाच माहीत असतं जो त्या परिस्थितीतून जात असतो. त्यामुळे काळ हे या सर्वाचं जालीम औषध आहे. जसजसा काळ पुढे जाईल तसतसं ती बरी होईल. ती एक प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि बड्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी ती तयार आहे.'

विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती हिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात तेलुगू भाषेतील चित्रपटाने 'तुनीगा तुनीगा' पासून केली होता.  तिचा हा चित्रपट सन २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचवेळी रियाने 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  रियाने या चित्रपटात जसलीनची भूमिका केली होती. त्यानंतर रियाने 'सोनाली कॅबल', 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'बँक चोर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती शेवटची मोठ्या पडद्यावर 'जलेबी' या सिनेमात दिसली होती. दरम्यान, तिचा हा चित्रपट प्रेक्षकांवर काही खास ठसा उमटवू शकला नाही.

आतापर्यंत रियाला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी ओळख मिळू शकली नव्हती. मात्र, आता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर रिया बरीच चर्चेत आली. त्यामुळे आता तिच्या आगामी चित्रपटात ती नेमकी काय कमाल करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी