Rhea Chakraborty: सुशांत सिंगच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीने दिला आठवणींना उजाळा; रोमॅंटिक फोटो शेअर करत लिहला भावनिक मेसेज

बी टाऊन
Updated Jun 14, 2022 | 14:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sushant Singh Rajput Death Anniversary । सुशांत सिंग राजपूतची आज दुसरी पुण्यतिथी आहे. १४ जून २०२० रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले होते. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती. सुशांत सिंग राजपूतच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत.

Rhea Chakraborty shares a romantic photo with emotional message on the occasion of Sushant Singh's death anniversary
सुशांत सिंगच्या पुण्यतिथीनिमित्त रियाने लिहला भावनिक मेसेज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुशांत सिंगच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीने दिला आठवणींना उजाळा.
  • रोमॅंटिक फोटो शेअर करत लिहला भावनिक मेसेज.
  • सुशांत सिंग राजपूतची आज दुसरी पुण्यतिथी आहे.

Sushant Singh Rajput Death Anniversary । मुंबई : सुशांत सिंग राजपूतची आज दुसरी पुण्यतिथी आहे. १४ जून २०२० रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले होते. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी शोककळा पसरली होती. सुशांत सिंग राजपूतच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. एवढेच नाही तर सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेही त्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या इंन्स्टाग्रामवर सुशांत सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि तिने त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिया चक्रवर्तीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत आणि ते त्यांच्या आवडत्या कलाकारालाही मिस करत आहे. (Rheaa Chakraborty shares a romantic photo with emotional message on the occasion of Sushant Singh's death anniversary). 

अधिक वाचा : पावसात अचानक झाडावर पडली भयानक वीज, पाहा धक्कादायक व्हिडीओ

रिया चक्रवर्तीने दिला आठवणींना उजाळा

सुशांत सिंग राजपूतसोबतचा तिचा फोटो शेअर करत रिया चक्रवर्तीने लिहिले की, "मला रोज तुझी आठवण येते." अशाप्रकारे रियाने तिचा भावनिक मेसेज चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे. रियाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लिहिले आहे की, आम्ही त्याला खूप मिस करतो. त्याच्या आत्म्याला शांती लाभो आणि तू रिया फिट राहो. अशा प्रकारे सर्व चाहते सुशांत सिंग राजपूतची आठवण काढत आहेत. 

रोमॅंटिक फोटो शेअर करत लिहला भावनिक मेसेज

२९ वर्षीय रिया चक्रवर्तीच्या करिअर बद्दल भाष्य करायचे झाले तर ती काळी काळापूर्वी दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या 'चेहरे' चित्रपटाचा भाग होती. या चित्रपटात रियासोबत अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी आणि अनु कपूर दिसले होते. रियाने तिच्या करिअरची सुरुवात 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटातून केली होती. रिया चक्रवर्तीने हिंदीशिवाय, तुनेगा या तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी