रिया चक्रवर्तीने शेअर केले सुशांत सिंह राजपूतसोबतचे व्हॉट्सअॅप चॅट्स

बी टाऊन
Updated Aug 09, 2020 | 14:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rhea Chakraborty Sushant Singh Rajput messages: रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतसोबतचे व्हॉट्सअॅप चॅट शेअर केले आहे. चॅटमध्ये सुशांतने आपल्या बहिणीबाबत नाराजी व्यक्त केली होती

Narendra Modi full speech: ?? ??????? ?? ??????? ???????? ??...??, ???? ??????? ???? ?? ???? ???? ?????

थोडं पण कामाचं

  • सुशांत प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत.
  • रिया-सुशांतचे व्हॉट्सअॅप चॅट आले समोर
  • सुशांतने आपल्या चॅटमध्ये आपल्या बहिणीबाबत म्हटले होते

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या(sushant singh rajput suicide case) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. एकीकडे सुशांत आणि त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती(rhea chakraborty) यांच्या नात्याबाबत अनेक दावे केले जातआहेत. तर दुसरीकडे व्हॉट्सअॅप मेसेजची(whatsapp message) एंट्री झाली आहे. रियाने सुशांतसोबत झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीन शॉट शेअर केला आहे. शेअर केलेल्या चॅटमध्ये दोघांमध्ये बहीण प्रियंकावरून बोलणे झाले होते. सुशांतने आपल्या बहिणीबाबत नाराजी व्यक्त केली होती ती व्हिक्टिम कार्ड खेळत आहे आणि सिद्धार्थ पठाणी मॅन्युपलेट करत आहे. 

इंडिया टुडेसोबत शेअर केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटच्या स्क्रीन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता की सुशांत बातचीत करताना रियाच्या कुटुंबियांचे कौतुक करत आहे. सुशांतने लिहिले, तुझे कुटुंब खरंच चांगले आहे. शॉविक(रियाचा भाऊ)कडे खूप सहानुभूती आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या बदलांमागचे कारण तु आहेस. तुमच्या सगळ्यांच्या जवळ राहणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. चीअर्स मेरी दोस्त, रॉकस्टार बनण्यासाठी.

Rhea Chakraborty Sushant Singh Rajput

यानंतर सुशांतने पुढे लिहिले, तो त्याच्या बहिणीबाबत चिंतेत आहे. त्याने लिहिले की माझी बहीण आता व्हिक्टिम कार्ड खेळत मॅन्युपलेट करत आहे ज्यामुळे इतर गोष्टींवरून ध्यान विचलित होऊन माझ्यावर येईल. मी त्यांना त्रास दिला जी खरंच दु:खदायक गोष्ट आहे. सुशांतने लिहिले की ती दारुच्या नशेत केलेल्या कृत्यावरून विक्टिम कार्ड खेळत कव्हरअप करण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतने पुढे लिहिले की त्याची बहिण आईने शिकवलेल्या गोष्टींविरुद्ध गेली. तिला जर तिच्या अहंकारामुळे दुसरे काही दिसत नसेल तर देव तिचे भले करो. मी घाबरत नाही आणि पुढेही जग बदलण्यासाठी आपले काम सुरूच ठेवेन. 

विशेष म्हणजे रिया चक्रवर्तीने नुकतेच दोन फोटो शेअर केले होते, याच्या माध्यमातून सांगण्यात आले की सुशांतच्या दोन प्रॉपर्टी आहेत. एका फोटोत सुशांतच्या हाताने लिहिलेली आभार मानणारी पोस्ट होती. तर दुसऱ्या फोटोत छिछोरेटे प्रिंट असलेली बॉटल होती. सुशांतने आपल्या जीवनात रिया आणि तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीसाठी आभार व्यक्त केले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी