Sonam Kapoor Baby Boy first glimpse : सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक आली समोर, भाच्याला पाहून मावशी रेहा कपूर भावूक

बी टाऊन
Updated Aug 22, 2022 | 20:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sonam Kapoor Baby Boy first glimpse: अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Aahuja) यांच्या घरी शनिवारी एका गोंडस मुलाचा जन्म झाला. सोनम आणि आनंद आहुजा बाळाचे आई-बाळा झाले आहेत. सोनम कपूरची बहीण रेहा कपूरने (Rhea kapoor) बाळाची पहिली झलक शेअर केली आहे.

Rhea Kapoor shares first glimpse of Sonam Kapoor baby boy
सोनमच्या बाळाची पहिली झलक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोनम कपूरने शनिवारी 20 ऑगस्टला मुलाला जन्म दिला.
  • सोनम कपूरची बहीण रेहा कपूरने बाळाची पहिली झलक शेअर केली आहे.
  • आपल्या भाच्याला पाहून मावशी रेहा कपूर खूपच भावूक झाली.

Sonam Kapoor Baby Boy first glimpse: सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद आहुजा (Anand Aahuja) शनिवारी 20 ऑगस्ट रोजी मुलाचे (Sonam Kapoor Baby Boy) पालक झाले.अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. तेव्हापासून चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सोनमचे अभिनंदन करत आहेत. आता सोनमची बहीण रेहा कपूरने (Rhea kapoor) तिच्या पुतण्याची पहिली झलक दाखवली आहे. हॉस्पिटलमध्ये बाळासोबत रेहा कपूर दिसत आहे. यावेळी ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले. ( Rhea Kapoor shares first glimpse of Sonam Kapoor baby boy)

अधिक वाचा : या 4 गोष्टी आहेत हृदयाच्या शत्रू..येईल हृदयविकाराचा झटका


रेहा कपूरने (Rhea Kapoor) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पुतण्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये रेहा कपूर आपल्या भाच्याचे कौतुक करत आहे. पुतण्याला पाहून रेहाचे डोळे पाणावले आहेत. मात्र, रेहाने फोटोंमध्ये बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये रेहा कपूरने लिहिले की, "रेहा मावशीचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे . तू खूप गोंडस आहेस. हा क्षण स्वप्नासारखा आहे. आई सोनम कपूर, वडील आनंद आहुजा. नवीन आजोबा आणि आजी अनिल कपूर आणि सुनीता कपूर  सगळ्यांकडून खूप खूप प्रेम"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)


सोनम कपूरने आई झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सोनम म्हणाली होती, 'साहजिकच आता आमच्या प्रायोरिटीज बदलतील. आता मुलाची जबाबदारी आमच्यावर आहे. बाळाला आपण आपल्या इच्छेने या जगात आणतो, त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या जन्मानंतर सोनम कपूरची तब्बेत चांगली आहे. सध्या ती काही काळ मुंबईत राहणार आहे.

अधिक वाचा :  House of The Dragons वेबसीरिजची सोशल मीडियावर चर्चा

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे लग्न २०१८ मध्ये झाले. मार्च 2022 मध्ये सोनम कपूरने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. सोनम शेवटची झोया फॅक्टर या चित्रपटात दिसली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी