Ramgopal Verma Ladki | रामगोपाल वर्मा यांचा 'लडकी' या चित्रपटाची करोडांना विक्री, चीन ते दुबई सर्वत्र डंका

बी टाऊन
विजय तावडे
Updated Nov 14, 2021 | 18:28 IST

Ladki Rights Sold : पूजा भालेकरने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. चित्रपट पाहताना यातील अॅक्शन सिन्स पाहून याचा अंदाज येतो. अर्थात या चित्रपटात राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाची ती कमाल दिसून येत नाही ज्यासाठी त्यांचे चित्रपट ओळखले जातात. या चित्रपटाचे हक्क ४० लाख डॉलरना म्हणजे २९ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षा ही रक्कम कितीतरी जास्त आहे.

Ramgopal Verma Film Ladki
रामगोपाल वर्मा यांचा चित्रपट 'लडकी'  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • रामगोपाल वर्मा यांचा आगामी चित्रपट लडकी : एंटर द गर्ल ड्रॅगन
  • पहिला भारतीय मार्शल आर्ट चित्रपट
  • या चित्रपटाचे हक्क ४० लाख डॉलरना म्हणजे २९ कोटी रुपयांना विकले गेले

Ramgopal Verma Ladki Rights Sold | मुंबई : अलीकडेच रामगोपाल वर्मा (Ramgopal Verma) यांच्या डेजरस या चित्रपटाच्या हक्कांच्या यशस्वी विक्रीनंतर आता त्यांचा आगामी चित्रपट 'लडकी : एंटर द गर्ल ड्रॅगन' च्या (Ladki) हक्कांची देखील कोट्यवधींना विक्री झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच जबरदस्त चर्चेत आहे. कारण हा पहिला भारतीय मार्शल आर्ट चित्रपट (First Indian film on Martial Arts) आहे आणि हा चित्रपट इंडो-चायनीज संयुक्त प्रोडक्शनद्वारे बनला आहे. (Rights for Ramgopal Verma's film Ladki sold for Rs 29 crores)

एका जिगरबाज मुलीची कथा

या चित्रपटाचे हक्क ४० लाख डॉलरना म्हणजे २९ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षा ही रक्कम कितीतरी जास्त आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच चित्रपट यशस्वी झाला आहे. रामगोपाल वर्मा याचा दुहेरी आनंद आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत आलेल्या बदलामुळे देखील ते खूश आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की एक भक्कम निर्धार असणारी मुलगी कसे मार्शल आर्ट्स एक्सपर्ट बनते आणि मग ती समाजातील ताकदवान लोकांशी संघर्ष करते. प्रत्येकजण तिला मुलगी समजून कमी लेखतो. मात्र ती आपली हिंमत आणि मार्शल आर्ट्सच्या कौशल्यावर त्या सर्वांना भारी पडते. 

पूजा भालेकरची मेहनत

पूजा भालेकरने या चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. चित्रपट पाहताना यातील अॅक्शन सिन्स पाहून याचा अंदाज येतो. अर्थात या चित्रपटात राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनाची ती कमाल दिसून येत नाही ज्यासाठी त्यांचे चित्रपट ओळखले जातात. मागील दहा वर्षात त्यांच्या कोणत्याही चित्रपटात ती कमाल दिसून आली नाही जी सत्या, सरकार, सरकार राज सारख्या चित्रपटांमधून दिसली होती. बॉलीवूडमधील असोसिएशन्सने त्यांच्यावर बंदी घातली आहे कारण त्यांच्यावर कामगारांचे १३ कोटी रुपये थकित आहेत आणि वर्मा यांनी अद्याप ते दिलेले नाहीत. त्यामुळे रामगोपाल वर्मा आता गोव्यातून आपल्या चित्रपटांचा व्यवसाय चालवत आहेत.

चीनमध्ये होणार जबरदस्त प्रदर्शन

लडकी या चित्रपटाचे जागतिक हक्क (चीनव्यतिरिक्त) विकले गेले आहेत. हे हक्क २९ कोटींना विकले गेले आहेत. रामगोपाल वर्मा यांच्या चित्रपटाच्या चायनीज व्हर्जनचे नाव द ड्रॅगन गर्ल असे आहे. १० डिसेंबर २०२१ ला चीनमधील वीस हजार चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. याशिवाय लडकी हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेतदेखील प्रदर्शत केला जाणार आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाचा एक मोठा इव्हेंट दुबईमध्येदेखील आयोजित केला जाणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत पूजा भालेकर, मल्होत्रा शिवम आणि प्रतीक परमार आहेत. या चित्रपटाचे प्रोमोज पाहून चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाबद्दल कुतुहल निर्माण झाले आहे. विशेषत: या चित्रपटातील अॅक्शन सीन्सची चर्चा होते आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी