Sushant Singh Rajput Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Bureau of Narcotics Control) अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Actress Riya Chakraborty) अभिनेता सुशांत सिंग (Actor Sushant Singh) ड्रग्ज (Drugs) प्रकरणी आरोपी बनवले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपींकडून अनेकदा गांजा खरेदी करुन तो सुशातसिंहला दिला होता, असा आरोप केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केला आहे. तसेच, रिया चक्रवर्तीचे ड्रग्ज प्रकरण हे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी जोडलेले आहे, असा दावाही एनसीबीने केला आहे.
NCB आरोपपत्रात म्हटले आहे की, "आरोपी क्रमांक 10 म्हणजेच रिया चक्रवर्ती आरोपी क्रमांक 6 सॅम्युअल मिरांडा, आरोपी क्रमांक 7 सौविक चक्रवर्ती आणि आरोपी क्रमांक 8 दीपेश सावंत आणि इतरांकडून गांजाच्या अनेक डिलिव्हरी मिळाल्या. त्यानंतर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला गांजा देण्यात आला. मार्च, 2020 आणि सप्टेंबर 2020 दरम्यान सौविक आणि राजपूतऐवजी तिने त्या डिलिव्हरीसाठी पैसे देखील दिले.
Read Also : हे तीन गुण असलेले लोक संकटांपासून राहतात दूर
सुशांत सिंग राजपूतशी संबंधित या ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स ब्युरोने रिया चक्रवर्ती आणि इतर 34 जणांना आरोपी बनवले आहे. आता एनसीबीचे आरोप खरे ठरले तर त्यांना 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. उच्चभ्रू सोसायटी आणि बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थांचे वितरण, विक्री आणि खरेदी करण्यासाठी सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान गुन्हेगारी कट रचला होता. एनसीबीने म्हटले आहे की, रियाने सुशांतच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, घरातील कर्मचारी दीपेश सावंत आणि इतरांकडून गांजा खरेदी केला. सुशांत सिंह प्रकरणात हे तिघेही आरोपी असून सध्या ते जामीनावर आहेत.
Read Also : केसरकरांना 'या' गोष्टीमुळे शिंदे वाटतात मोठ्या मनाचे सीएम
तर रिया चक्रवर्तीला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती आणि जवळपास महिनाभर ती तुरुंगात होती. मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर ती बाहेर आली. ड्रग्जचा अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांची चौकशी करण्यात आली. 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची बातमी आली. दुपारी, चाहत्यांना कळले की सुशांत सिंग राजपूतने त्याच्या अपार्टमेंटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती.