Rocketry movie IMDB rating : 'रॉकेट्री'ने IMDb रेटिंगमध्ये 'शेरशाह' आणि 'द काश्मीर फाइल्स'चा मागे टाकलं

बी टाऊन
Updated Jul 04, 2022 | 18:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rocketry movie IMDB rating :'रॉकेट्री'च्या कथेपासून ते आर माधवनच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. दरम्यान, 'रॉकेट्री'ने IMDb रेटिंगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. शेरशाह आणि काश्मीर फाइल्स या सिनेमांना मागे टाकलं आहे.

Rocketry movie beats shershaah and the kashmir files in IMDB rating
'रॉकेट्री'ने शेरशाह आणि 'द काश्मीर फाइल्स'ला टाकलं मागे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रॉकेट्री सिनेमाने शेरशाह, काश्मीर फाइल्स सिनेमांना मागे टाकलं
  • IMDB रेटिंगमध्ये रॉकेट्री सिनेमाची चमकदार कामगिरी
  • रॉकेट्री सिनेमाला 9.3 रेटिंग मिळाले आहे.

Rocketry movie IMDB rating : आर माधवनचा द नंबी इफेक्ट हा चित्रपट १ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे समीक्षकांनी भरभरून कौतुक केले. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर त्याची सुरुवात संथ झाली पण शनिवारी दुसऱ्या दिवशी त्याची गती वाढली. माऊथ पब्लिसिटीचा फायदा या चित्रपटाला मिळणार असून आगामी काळात तो चांगली कमाई करेल, असा विश्वास आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते माधवनच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, 'रॉकेट्री'ने IMDb रेटिंगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

माधवन यांची प्रतिक्रिया


रॉकेट्रीला IMDb वर 9.3 रेटिंग मिळाले आहे. यावर माधवनने आनंद व्यक्त केला. ही बातमी शेअर करताना त्याने लिहिले - Wowwwweeee. पुढे, त्याने रॉकेट आणि हात जोडणारा इमोजी बनवला.

अधिक वाचा : राम रहीम खरा की खोटा, न्यायाधीशांनी याचिकेवर दिले हे उत्तर


या सिनेमांना टाकलं मागे

गेल्या वर्षी 2021 मध्ये रिलीज झालेल्या सूर्याच्या 'जय भीम' चित्रपटाला 8.9 रेटिंग मिळाले आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा 'शेरशाह' सर्वाधिक रेटिंगमुळे चर्चेत होता. शेरशाह चित्रपटाला  8.4 रेटिंग मिळाले. तर 'द काश्मीर फाइल्स'ला 8.3 रेटिंग मिळाले आहे.

अधिक वाचा : आहारात करा या फळाचा समावेश, पोटाची चरबी होईल कमी


सिनेमाचे आतापर्यंतचे कलेक्शन

'रॉकेट्री'ची कथा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन हे 'रॉकेट्री'चे निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 1.25 कोटींची कमाई केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी