RRR Movie trailer:‘आरआरआर’ च्या ट्रेलरचा प्रत्येक सीन अंगावर रोमांच आणणारा, बाहुबलीचा मोडला रेकॉर्ड

RRR Movie trailer : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अजय देवगण, राम चरण आणि एनटीआर ज्युनियरचा मोस्ट अवेटेड 'आरआरआर' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

RRR Movie trailer: Every scene of 'RRR' thrills, breaks the record of Bahubali
RRR Movie trailer:‘आरआरआर’ चा प्रत्येक सीन अंगावर रोमांच आणणारा, बाहुबलीचा मोडला रेकॉर्ड ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'आरआरआर'चा ट्रेलर रिलीज
  • ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगण अॅक्शन करताना दिसत आहे,
  • आलिया भट्टही दमदार राॅलमध्ये दिसत आहे

RRR Movie trailer: मुंबई :  साऊथ सुपरस्टार राम चरण(Ram Charan), एनटीआर ज्युनियर(NTR Jr.), अजय देवगण(Ajay Devgan), आलिया भट्टचा (Alia Bhatt) मोस्ट अवेटेड 'आरआरआर' चित्रपटाचा ट्रेलर (Movie Trailer) रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून या सर्व कलाकारांचे लूक आणि अ‍ॅक्शन पाहून असे वाटते की येत्या 2022 मध्ये हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरेल. 'बाहुबली' (Bahubali) सीरिजसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर'च्या ट्रेलरमध्ये उत्कृष्ट संवाद आणि अॅक्शन पाहायला मिळत आहे. (RRR Movie trailer: Every scene of 'RRR' thrills, breaks the record of Bahubali) 

RRR ट्रेलरचा दमदार लूक

'RRR' चित्रपटाचा ट्रेलर व्हिडिओ सुमारे 3 मिनिटे 16 सेकंदांचा आहे. या काही मिनिटांत चित्रपटातील सर्व कलाकारांचे लूक समोर आले आहेत. ट्रेलरची सुरुवात ब्रिटिश बिल्डिंगपासून होते. दुसऱ्या सीनमध्ये एक कोर्ट दिसते, ज्याच्या पार्श्वभूमीवर असा आवाज येतो की स्कॉट सर जेव्हा आदिलाबादला आले तेव्हा त्यांनी एका लहान मुलीला आणले... ती खरं तर गोंड मुलगी आहे. यावर एक व्यक्ती म्हणते - मग... त्यांच्या डोक्याला शिंगे आहेत का? चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रामचरणसोबत ज्युनियर एनटीआर अॅक्शन अवतारात दिसत आहे. एनटीआर एका ठिकाणी वाघाशी लढताना दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया आणि अजयला कमी दाखवण्यात आले असले तरी या दोघांनीही त्यांच्या दमदार लूकने आणि संवादांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. ट्रेलरमध्ये अजय देवगण जोरदार डायलॉग मारताना दिसत आहे. 

https://youtu.be/f_vbAtFSEc0

तेलगू स्वातंत्र्यसैनिकाची कथा

'RRR' चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमध्ये अशी अनेक भव्य दृश्ये पाहायला मिळत आहेत, ज्यांना पाहून चाहते तसेच सेलिब्रिटीही त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. हा चित्रपट 7 जानेवारी 2021 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. जवळपास 300 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याला हिंदीतही डब करण्यात आले आहे. हा चित्रपट तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या कथेवर आधारित आहे. जे ब्रिटिश राजवटी आणि हैदराबादच्या निजामांविरुद्ध लढले.

रिलिजपूर्वी ८९० कोटींचा व्यवसाय

राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाचे नॉर्थ इंडियन राइट्स 140 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या करारानंतर चित्रपटाने रिलीजपूर्वीच 890 कोटींचा व्यवसाय केला आहे. यासह या चित्रपटाने बाहुबली 2 ला मागे टाकले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी