महाराष्ट्राच्या मातीची जाण ठेवणारे कलाकार, रितेश-जेनेलियानी पूरग्रस्तांसाठी दिला 'इतक्या' लाखांचा चेक!

बी टाऊन
Updated Aug 13, 2019 | 15:45 IST

Flood Relief: रितेश आणि जेनेलियानी पूरग्रस्तांसाठी तब्बल २५ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा चेक सुपूर्द केला. 

ritesh_and_genelia_twitter
रितेश-जेनेलियानी पूरग्रस्तांसाठी दिला 'इतक्या' लाखांचा चेक  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पूरग्रस्तांसाठी रितेश आणि जेनेलिया देशमुखने केली लाखो रुपयांची मदत
  • रितेश देशमुखने मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला मदतीचा चेक
  • मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुंबई: बॉलिवूडमधील एक स्टार जोडपं म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा. रितेश देशमुख हा बॉलिवूडमधील मोठा स्टार असला तरीही तो मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राला अजिबात विसरलेला नाही. आजवर रितेशने मराठी सिनेमासाठी आणि कलाकारांसाठी बरंच काही केलं आहे. पण आता त्याने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुराची स्थिती अत्यंत भयंकर होती. त्यामुळे रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांनी थेट आर्थिक मदत केली आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी  थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २५ लाख रुपयांची मदत केली आहे. त्यांनी आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना २५ लाखांचा चेक सुपूर्द केला. 

रितेश आणि जेनेलिया यांनी केलेल्या या मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहे. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी चेक स्वीकारत असतानाच फोटो देखील ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये आपण पाहू शकता की, रितेश आणि जेनेलिया २५ लाखांचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत आहेत. त्यांनी केलेली ही आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, 'महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्रा सहाय्यता निधीमध्ये २५ लाख रुपयांचं योगदान देण्यासाठी धन्यवाद जेनेलिया आणि रितेश देशमुख.' 

 

 

महाराष्ट्र सरकारकडून सध्या पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यावेळी या तीनही जिल्ह्यात ४३२ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून जवळजवळ ३.७८ लाख लोकांना इथे ठेवण्यात आलं आहे. या तीनही जिल्ह्यांमध्ये जवळजवळ १० दिवस पुराचं पाणी होतं. या पाण्याची पातळी प्रचंड असल्याने अद्यापही काही भागांमध्ये पाणी साचून असल्याचं दिसतं आहे. 

कोल्हापूर आणि साताऱ्यातील धरण क्षेत्रात तुफान पाऊस झाल्याने येथील धरणं तुडुंब भरून वाहू लागली होती. त्याचवेळी शहरी भागातही पावसाचा जोर तुफान होता. धरण क्षेत्रातील पावसामुळे धरणाच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्याने येथील सर्व धरणांचे दरवाजे उघडण्यात आले होते. कोल्हापूरमधील राधानगरी आणि साताऱ्यातील कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. यामुळे फक्त सखल भागातच नव्हे तर महामार्गावर देखील पाणी आलं होतं. यामुळे तब्बल ६ दिवस महामार्ग बंद होता. 

या पुरामुळे येथील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. याचवेळी काही स्वयंसेवी संस्था देखील मदत करत आहे. तर अनेक मराठी सेलिब्रिटींनीही पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देऊ केली आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनीही पूरग्रस्तांना मदत करावी असं आवाहन काही राजकीय पक्षांनी केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
महाराष्ट्राच्या मातीची जाण ठेवणारे कलाकार, रितेश-जेनेलियानी पूरग्रस्तांसाठी दिला 'इतक्या' लाखांचा चेक! Description: Flood Relief: रितेश आणि जेनेलियानी पूरग्रस्तांसाठी तब्बल २५ लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा चेक सुपूर्द केला. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...