Saaho: प्रभास-श्रद्धाचा रोमांटिक फोटो लीक, सोशल मीडियावर व्हायरल

बी टाऊन
Updated Apr 15, 2019 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prabhas Sharddha Saaho Picture: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’तील एक रोमांटिक फोटो लीक झालाय. या फोटोत प्रभास आणि श्रद्धा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोमांटिक पोज देताना दिसत आहेत.

Saaho leaked photo
Saaho: प्रभास-श्रद्धाचा रोमँटिंक फोटो लीक, सोशल मीडियावर व्हायरल  |  फोटो सौजन्य: Instagram

Prabhas Sharddha Saaho Romantic Picture leak:  साऊथचा सुपरस्टार प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. प्रभास ‘साहो’ या चित्रपटात क्यूट अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत दिसणार आहे. हा चित्रपट यंदाच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. ‘साहो’ हा चित्रपट भारतात बनणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत महाग चित्रपट आहे, शिवाय हा एक हार्डकोअर ऍक्शन चित्रपट आहे. यात पहिल्यांदा श्रद्धा कपूर आणि प्रभास एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. नुकताच साहोतील त्या दोघांचा एक रोमँटिक फोटो लीक झाला आहे.
सध्या श्रद्धा आणि प्रभासचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांचा अपकमिंग चित्रपट ‘साहो’तला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटो चित्रपटातील एका गाण्यातील आहे. या फोटोमध्ये गुलाबी सेपरेट्समध्ये दिसत असलेली श्रद्धा खूप क्यूट दिसतेय. तर व्हाईट टी-शर्टमधील प्रभास श्रद्धाच्या डोळ्यात डोळे घालून रोमांस करतांना दिसतोय.

साहोचा टिझर यापूर्वीच रिलीज झाला आहे. मात्र या टीझरमध्ये आपल्याला एकही रोमँटिक सिन दिसत नाही. टीझर ऍक्शन्सनी परिपूर्ण आहे. अशातच हा फोटो पाहून श्रद्धा आणि प्रभासच्या फॅन्सच्या मनात चित्रपटाविषयीची क्रेझ आणखी वाढलेली दिसतेय. या दोघांची केमेस्ट्री आता मोठ्या पडद्यावर कशी दिसेल, याची वाट सर्वजण पाहत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Looking Amazing #ShraddhaKapoor & #Prabhas from the set of #Saaho shooting for a song @shraddhakapoor

A post shared by Shraddha kapoor2 (@shraddhakapoor10) on

 

‘साहो’ चित्रपटाचे टीझर्स हे दोन चॅप्टर्समध्ये आलेले आहेत. एक टीझर प्रभासच्या बर्थडे रिलीज झाला होता, तर दुसरा टिझर श्रद्धाच्या वाढदिवशी समोर आला.

 

 

 

साहो चित्रपटात भरपूर ऍक्शन सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सिन्स हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट मॅन डायरेक्टर कैनी बेट्स यांच्या देखरेखीखाली शूट केले गेले आहेत. कैनी हे हॉलिवूडचे खूप प्रसिद्ध ऍक्शन डायरेक्टर आहेत. त्यांनी फास्ट अँड फ्यूरिअस सारख्या चित्रपटांचं ऍक्शन डिरेक्शन केलेलं आहे.

 


‘साहो’ चित्रपट सुजीत यांनी दिग्दर्शित केलाय. हा चित्रपट तेलुगू, तमीळ आणि हिंदी या भाषांमध्ये ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलाय. यात श्रद्धा आणि प्रभास सोबत नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे सारखे कलाकार सुद्धा दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट २०१९ला रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Saaho: प्रभास-श्रद्धाचा रोमांटिक फोटो लीक, सोशल मीडियावर व्हायरल Description: Prabhas Sharddha Saaho Picture: अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’तील एक रोमांटिक फोटो लीक झालाय. या फोटोत प्रभास आणि श्रद्धा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोमांटिक पोज देताना दिसत आहेत.
Loading...
Loading...
Loading...