Happy Birthday Sai Pallavi: मेकअपशिवाय खूप सुंदर दिसते साई पल्लवी, नाकारली होती फेअरनेस क्रीमची 2 कोटींची जाहिरात

बी टाऊन
भरत जाधव
Updated May 09, 2022 | 15:00 IST

सर्वात सुंदर अभिनेत्री (Actress) म्हणून ओळखली जाणारी साई पल्लवी आज 30 वर्षांची झाली आहे. साई ही ती साऊथ सिनेसृष्टीतील (South Cineworld) अभिनेत्री असून जिचा फोटो सोशल मीडियावर (social media) पोस्ट होताच व्हायरल होत असतो.

Happy Birthday Sai Pallavi
मेकअपशिवाय खूप सुंदर दिसते साई पल्लवी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • साई पल्लवी सेंथामाराया यांचा जन्म तामिळनाडूमधील कोटागिरी, निलगिरी जिल्ह्यातील बडागा कुटुंबात झाला.
  • प्रेमम चित्रपटातून साई पल्लवीने आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली.
  • साई पल्लवी अभिनयाबरोबर आपल्या उत्तम नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.

Happy Birthday Sai Pallavi:  नवी दिल्ली : सर्वात सुंदर अभिनेत्री (Actress) म्हणून ओळखली जाणारी साई पल्लवी आज 30 वर्षांची झाली आहे. साई ही ती साऊथ सिनेसृष्टीतील (South Cineworld) अभिनेत्री असून जिचा फोटो सोशल मीडियावर (social media) पोस्ट होताच व्हायरल होत असतो. ती तिच्या साधेपणाने चाहत्यांच्या मनावर ती नेहमी राज्य करते. साई पल्लवी सेंथामाराया यांचा जन्म तामिळनाडूमधील कोटागिरी, निलगिरी जिल्ह्यातील बडागा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सेंथामराय कन्नन आणि आईचे नाव राधा आहे. साईचे पालनपोषण आणि शिक्षण कोईम्बतूर येथे झाले.

'प्रेमम' चित्रपटातून पदार्पण

तुम्हाला माहिती आहे का की जर साई अभिनेत्री बनली नसती तर आज ती कार्डिओलॉजिस्ट झाली असती. खरंतर साईला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं पण कदाचित नशिबात वेगळंच काही लिहिलं असेल. 2014 मध्ये ती जेव्हा शिक्षण घेत होती, तेव्हाच तिला 'प्रेमम' चित्रपटात 'मलार'च्या भूमिकेसाठी ऑफर मिळाली होती.साईने ही ऑफर स्वीकारली आणि इथून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर त्याचा 'काली' हा मल्याळम चित्रपटही खूप गाजला आणि यात साईने केलेल्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं. 

sai

साईने आतापर्यंत 16 चित्रपटात काम केलं आहे. 

आतापर्यंत पल्लवीने केवळ 16 चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि इतक्या कमी कालावधीत तिने मोठे स्थान मिळवले आहे. प्रेमम आणि फिदा या चित्रपटांसाठी त्यांना 'फिल्मफेअर अवॉर्ड'ही मिळाला आहे. तसेच, फोर्ब्स इंडियाच्या टॉप 30 मध्ये त्याची नाव समाविष्ट होते.

pallavi

जगबचं आहे साईचं नृत्य कौशल्य 

तिच्या उत्कृष्ट अभिनयाव्यतिरिक्त, साई पल्लवी तिच्या नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखली जाते. ती किती छान नृत्य करते हे तिच्या नृत्यकौशल्याची चाहत्यांना चांगलीच कल्पना आहे. तिला नृत्य करण्याची प्रेरणा तिच्या आईकडून मिळाली, ज्याबद्दल ती तिच्या मुलाखतींमध्ये अनेकदा सांगते.
जेव्हा साईने पहिल्यांदा तिच्या आईला तिच्या नृत्याच्या आवडीबद्दल सांगितले तेव्हा तिच्या आईने माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय या अभिनेत्रींची गाणी वाजवून तिला प्रोत्साहन दिले. तिचा सराव करून घेत असतं. 

sai

मेकअपशिवाय चित्रपटात करते काम 

साई पल्लवी विना मेकअप चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. यामुळे ती सिनेप्रेमींमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. साई पल्लवी तिच्या पहिल्या 'प्रेमम' चित्रपटात विना मेकअप दिसली होती.

sai

दोन कोटींची जाहिरात नाकारली 

साईने फेअरनेस क्रीमची दोन कोटींची जाहिरात नाकारली आहे. सौंदर्य प्रसाधनांबद्दलच्या तिच्या नापसंतीबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली की ती सुंदर दिसण्यासाठी कधीही मेकअपचा वापर करत नाही. आणि लोकांना गोंधळात टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या जाहिरातीचा भाग बनू इच्छित नाही. सईच्या मते, जे नैसर्गिक आहे ते चांगले आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी