Sai Tamhankar : सईच्या फोटोतील 'तो' कोण याची उत्सुकता, शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण

बी टाऊन
Updated Nov 03, 2022 | 16:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे (Sai Tamhankar) पाहिलं जातं. सईने मराठीप्रमाणेच हिंदीतही स्वत:चा ठसा उमटवला आहे. सध्या सई चर्चेत आहे तिने पोस्ट केलेल्या 'त्या' फोटोमुळे. विशेष म्हणजे सईसोबत या फोटोत असलेली कोण या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.

sai tamhankar share post viral on social media asking who is that guy in photo
सईने शेअर केलेल्या फोटोतील 'तो' कोण?  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काय आहे सई ताम्हणकरच्या 'त्या' फोटोतील रहस्य?
  • फोटोतील व्यक्ती प्रतिक बब्बर असल्याच्या चर्चांना उधाण
  • सई आणि प्रतिक झी 5 च्या 'इंडिया लॉकडाऊन' सिनेमात झळकणार

Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे (Sai Tamhankar) पाहिलं जातं. सईने मराठीप्रमाणेच हिंदीतही स्वत:चा ठसा उमटवला आहे. 'मिमी' (Mimi movie) या सिनेमातील सईच्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं. सिनेमात सईने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवलेल्या सईने साऊथ इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे. मणीरत्नम यांच्या 'नवरस' या वेबसीरिजमध्ये सईने काम केलं आहे. तिचा पॉन्डिचेरी हा सिनेमाही काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाला. (sai tamhankar share post viral on social media asking who is that guy in photo)

अधिक वाचा : दीपिका-रणवीरमध्ये सारं काही आलबेल?

इमरान हाश्मीसोबत ती ग्राउंड झिरो या सिनेमा झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. सिनेमातील भूमिकांप्रमाणेच सई तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सई खूप सक्रीय आहे. ती तिच्या लेटेस्ट प्रोजेक्टचे अपडेट कायम इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सईचं फॅन फॉलोइंग इतकं आहे की तिने पोस्ट केलेले फोटो व्हायरल व्हायलाही फार वेळ लागत नाही. असंच काहीसं झालंय आता, सईने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोतील नेमकी ती व्यक्ती कोण यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Sai (@saietamhankar)

सईने फोटो पोस्ट करत म्हटले आहे, " हा आहे खराखुरा  कॅन्डिड फोटो. ओळखा पाहू"  सईच्या या पोस्टवर मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री क्रांती रेडकरने सईच्या पोस्टवर कमेंट करत म्हटले आहे,"मला माहिती आहे, खूप आधी याबद्दल आपण बोललो होतो. तुझ्या डोळ्यातील चमक सर्वकाही सांगत आहे". तर मनवा नाईकनेही "मला माहितेय... मला माहितेय..." अशी कमेंट फोटोखाली केलेली आहे. सईने शेअर केलेल्या फोटोत ती गप्पा मारताना दिसत आहे. हा माणूस पाठमोरा उभा असल्याने त्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र, सेलिब्रिटींच्या या कमेंट्सवरून फोटोतील 'ती' व्यक्ती कोण असा प्रश्न सईच्या चाहत्यांना पडला आहे. 

अधिक वाचा : 'पठाण' सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणी

मात्र, इतक्यात हार मानतील तर ते सईचे चाहते कसले, अशा रुबाबात चाहत्यांनीही फोटोवर अंदाज लावायला सुरूवात केली आहे. या फोटोत त्या व्यक्तीच्या मानेवर टॅटू दिसत आहे. या टॅटूवरून ती व्यक्ती प्रतिक बब्बर असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत. अभिनेता प्रतिक बब्बरसोबत झी 5 च्या 'इंडिया लॉकडाऊन' या सिनेमामध्ये सई झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने या सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं होतं. त्यामुळे सईच्या या फोटोतील ती व्यक्ती प्रतिक बब्बर असल्याचं मत चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी