१५० खोल्या असलेला सैफ-करीनाचा आलिशान पॅलेस, पाहा बंगल्याच्या आतील फोटो

सैफ अली खान (Saif Ali Khan) च्या पतोडी पॅलेस (Pataudi Palace)चे फोटो आता समोर आले आहेत. जे खूपच सुंदर आहेत. पाहा हे खास फोटो:   

saif ali khan's 150 room pataudi palace is very luxurious and beautiful see pictures inside the bungalow
१५० खोल्या असलेला सैफ-करीनाचा आलिशान पॅलेस, पाहा बंगल्याच्या आतील फोटो 

गुरुग्राम: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, हा नवाज मन्सूर अली खान यांचा मुलगा आहे. ज्याचा गुरूग्राममध्ये एक अलिशान बंगला आहे. ज्याला इब्राहिम कोठी म्हणूनही ओळखले जाते. सैफ आणि करीना बर्‍याचदा इथे वेळ घालविण्यासाठी जात असतात. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने असा दावा केला होता की, त्यांच्या या बंगल्यावर एका हॉटेल ग्रुपने कब्जा केला होता.

सैफने सांगितले होते की, त्याच्या वडिलांनी हा बंगला  नीमराणा हॉटेल्सला भाड्याने दिला होता ज्यांनी नंतर या बंगलावर अनधिकृतरित्या ताबा घेचसा होता. दरम्यान, हे वडिलोपार्जित घर परत मिळविण्यासाठी सैफला ते खरेदी करावे लागले होते. आता सैफ-करीनाच्या या बंगल्याची सुंदर छायाचित्रे समोर आली आहेत, जी कोणाचंही मन जिंकण्यासाठी पुरेशी आहेत.

माहितीनुसार, या पतौडी पॅलेसची रचना १९०० च्या दशकाच्या सुरूवातीस रॉबर्ट टोर रसेल (Robert Tor Russell) यांनी डिझाइन केलं होतं, ज्याला ऑस्ट्रियन आर्किटेक्ट Karl Molt von Heinz यांनी सहाय्य केलं होतं. त्याच्या सौंदर्यासाठी प्रख्यात असलेल्या या राजवाड्यात खूप मोठा कॉरिडोर आहे. तसंच रॉयल सलून रूम, पुरातन वस्तू, आणि बर्‍याच आलिशान गोष्टी आहेत. याशिवाय या बंगल्यात मोठे लॉन, व्हिक्टोरियन कारंजे आणि शेकडो अशा वस्तू आहेत ज्या या राजवाड्याला अधिक शाही स्वरूप देतात.

वाड्यात १५० खोल्या आहेत

१० एकरांवर बांधलेल्या या पतौडी पॅलेसमध्ये तब्बल १५० खोल्या आहेत. ज्यामध्ये ७ ड्रेसिंग रूम, ७ बाथरूम, ७ बिलियर्ड रूम आणि डायनिंग रूम आहेत. या पॅलेसची किंमत ८०० कोटी रुपये एवढी आहे. हा राजवाडा पतोडीचे ८ वे नवाब आणि सैफ अळी खानचे आजोबा यांनी आपला मुलगा आणि पतोडी खानदानचे शेवटचे नवाब मन्सूर अली खान पतोडी यांना वारसा म्हणून दिलं होतं.  मन्सूर अली खानचा यांचा जन्म ५ जानेवारी १९४१ रोजी झाला होता. तर त्यांचा मृत्यू २२ सप्टेंबर २०११ रोजी झाला होता.

दरम्यान, गेल्या वर्षी करीना कपूरने आपला ३९वा वाढदिवस पतौडी पॅलेसमध्येच साजरा केला होता. याच बर्थडे सेलिब्रेशनचे तिचे फोटोही समोर आले होते. यादरम्यान सैफ आणि करीना यांचा लीप लॉक असलेला एक फोटोही समोर आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी