Kamasutra 3D Actress: कामसूत्र 3D सिनेमातील 'या' अभिनेत्रीचं निधन

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 15:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kamasutra 3D Actress Saira Khan No More: एक्ट्रेस सायरा खान हिचं निधन झालं आहे. सायरा रूपेश पॉलचा सिनेमा कामसूत्र 3D मध्ये दिसली होती. सायरानं शर्लिन चोपडाला रिप्लेस केलं होतं.

Saira khan
Kamasutra 3D Actress: कामसूत्र 3D सिनेमातील 'या' अभिनेत्रीचं निधन 

Kamasutra 3D Actress Saira Khan died:  २०१३ ला आलेला कामसूत्र 3D सिनेमातील एक्ट्रेस सायरा खान हिनं अखेरचा श्वास घेतला आहे. मीडियाच्या रिपोर्टनुसार, या एक्ट्रेसचं कार्डियक अरेस्टनं निधन झालं आहे. या सिनेमात सायरानं शर्लिन चोपडाला रिप्लेस केलं होतं. हा सिनेमा बरेच विवाद झाले होते. सायराचं अचानक जाण्यानं कामसूत्र 3D सिनेमाचे डायरेक्टर रूपेश पॉल यांना धक्का बसला आहे. 

डीएनएच्या रिपोर्टनुसार रूपेश यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, सायरासाठी सिनेमा साईन करणं खूप  कठिण होतं. कारण सायरा एक अतिशय रूढिवादी मुस्लिम कुटुंबियातील होती. त्यातच मीडियामध्ये सिनेमावर एवढा वाद होऊनही बोल्ड सिनेमातून डेब्यू करणं तिच्यासाठी एक आव्हानचं होतं. शेवटी तिला बोर्डवर आणण्यासाठी आम्हांला बरेच महिने लागले. मला तिच्या निधनाची बातमी कळताच मी हैराण झालो. त्यानंतर मला समजलं की याबाबतीत कोणीच रिपोर्ट दाखल केली नाही त्यामुळे मला अजूनही धक्का बसला. 

पुढे त्यांनी सांगितलं की, आपल्या परफॉर्मेन्ससाठी सायरा तिची ओळख डिजर्व्ह करते. आम्हांला तिच्या जाण्यानं खूप दुःख झालं आहे. तिच्या आत्माला शांति लाभू हिच प्रार्थना देवाकडे करतो.  

कामसूत्र 3D पहिल्यांदा कांस फिल्म फेस्टिव्हल २०१३ मध्ये दाखवण्यात आली होती. या सिनेमात मकरंद देशपांडे आणि मिलिंद गुनाजी देखील दिसले होते. या सिनेमातून दिवगंत एक्ट्रेस सायराला जास्त ओळख मिळाली नव्हती. 

सायरा हिचं निधन शुक्रवारी सकाळी झालं. तिचा मृत्यू कार्डियक अरेस्टमुळे झाला. सायरा, शर्लिनला रिप्लेस केल्यानं चर्चेत आली होती. सायरा मोठ्या पडद्यावर दिसली नाही. मात्र रिझनल सिनेमात तिनं बरंच काम केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Kamasutra 3D Actress: कामसूत्र 3D सिनेमातील 'या' अभिनेत्रीचं निधन Description: Kamasutra 3D Actress Saira Khan No More: एक्ट्रेस सायरा खान हिचं निधन झालं आहे. सायरा रूपेश पॉलचा सिनेमा कामसूत्र 3D मध्ये दिसली होती. सायरानं शर्लिन चोपडाला रिप्लेस केलं होतं.
Loading...
Loading...
Loading...