अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा अंगरक्षक सोनूचा पगार आहे सीटीसी आणि सीईओंपेक्षाही जास्त

बी टाऊन
Updated Jul 17, 2021 | 00:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्याला माहितीच आहे की प्रश्न जेव्हा त्यांच्या सुरक्षिततेचा येतो तेव्हा बॉलीवुडमधल्या तारेतारका मोठी रक्कम मोजतानाही मागेपुढे पाहात नाहीत. अनुष्का शर्माचा खासगी अंगरक्षक सोनू हा कित्येक वर्षे तिच्यासोबत आहे.

Anushka and Virat with Sonu
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा अंगरक्षक सोनूचा पगार आहे सीटीसी आणि सीईओंपेक्षाही जास्त  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • लग्नाच्याही आधीपासून अनुष्कासोबत आहे सोनू
  • विरुष्कासाठी कुटुंबापेक्षा जास्त आहे सोनू
  • अनुष्काचा बॉडीगार्ड असूनही विराटला देतो सुरक्षा

आपल्याला माहितीच आहे की प्रश्न जेव्हा त्यांच्या सुरक्षिततेचा (Security) येतो तेव्हा बॉलीवुडमधल्या (Bollywood) तारेतारका (celebrities) मोठी रक्कम (big amount) मोजतानाही मागेपुढे पाहात नाहीत. जेव्हा ते लोकांमध्ये (people) असतात तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची इजा (harm) होऊ नये किंवा धोका (threat) पोहोचू नये यासाठी त्यांना सुरक्षाकड्याची (security ring) गरज असते. अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) खासगी अंगरक्षक (private bodyguard) सोनू (Sonu) हा कित्येक वर्षे तिच्यासोबत सावलीसारखा असलेला दिसतो. तो करत असलेल्या कामासाठी अनुष्का प्रकाश सिंह उर्फ सोनूला गलेलठ्ठ पगार (fat salary) देते.

लग्नाच्याही आधीपासून अनुष्कासोबत आहे सोनू

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्माचे भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न होण्याच्या आधीपासून सोनू तिच्यासाठी काम करत आहे. झूम डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार सोनूचा वार्षिक पगार हा 1.2 कोटीच्या घरात आहे. हे जर खरे असेल तर असे म्हणायला हरकत नाही की अनेक कंपन्यांच्या सीईओ आणि सीटीसींपेक्षा सोनूचा वार्षिक पगार जास्तच आहे.

विरुष्कासाठी कुटुंबापेक्षा जास्त आहे सोनू

प्रकाश उर्फ सोनू हा विराट आणि अनुष्कासाठी फक्त एक अंगरक्षक नाही, तर कुटुंबापेक्षाही जास्त आहे. अनुष्काच्या तर तो इतका जवळचा आहे की ती दर वर्षी त्याचा वाढदिवसही साजरा करते. ती जेव्हा शाहरुख खानसोबत झीरो या चित्रपटाचे चित्रीकरण करत होती तेव्हा चित्रपटाच्या सेटवर तिने सोनूचा वाढदिवस साजरा केला होता.

अनुष्काचा बॉडीगार्ड असूनही विराटला देतो सुरक्षा

सोनू हा फक्त अनुष्कालाच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी असताना विराटलाही सुरक्षा देतो. विराटचे खासगी सुरक्षारक्षक असूनही तो हे करतो. अनुष्का शर्मा जेव्हा गर्भवती होती तेव्हा सोनूने शक्य ते सगळे करून तिची काळजी घेतली. या काळात जेव्हा ती काम करत होती, कोरोनाच्या काळात जेव्हा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून मास्क घालून ये जा करत होती तेव्हा सोनू नेहमी तिच्या बाजूला पीपीई किट घालून तिच्या रक्षणासाठी तयार असलेला दिसत असे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी