Bollywood Big News : सलमानने केली 'बजरंगी भाईजान'च्या सिक्वेलची घोषणा, तर कंगनाच्या 'धाकड'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली

बी टाऊन
Updated Dec 20, 2021 | 18:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bollywood wrap : बॉलिवूडच्या दोन बड्या आणि चर्चेत असणाऱ्या स्टार्सबद्दलची महत्त्वाची बातमी आहे. सलमान खान 'बजरंगी भाईजान' सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे, तर दुसरीकडे, कंगनाच्या धाकड सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Salman announces sequel to 'Bajrangi Bhaijaan', new release date for Kangana's 'Dhakad'
'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल, 'धाकड' मे 2022 ला रिलीज होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कंगना राणौतचा धक्कड हा चित्रपट मे २०२२ ला रिलीज होणार आहे.
  • लाल सिंग चड्ढा आणि केजीएफ यांच्याशी रिलीज डेट क्लॅश झाल्याने निर्णय
  • सलमान आणणार 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल. राजामौलीचे वडील लिहिणार सिनेमाची कथा


Salman khan announce Bajrangi Bhaijan sequel : सलमान खानने 'बजरंगी भाईजान'च्या सिक्वेलची पुष्टी केली, एसएस राजामौलीचे वडील सिनेमाची कथा लिहिणार आहेत. सलमान खानने या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील केव्ही विजयेंद्र प्रसाद हे सिक्वेल लिहिणार आहेत.
'बजरंगी भाईजान'ची कथाही  केव्ही विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. तर चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. यात सलमान खानसोबत नवाजुद्दीन सिद्दीकी, करीना कपूर आणि हर्षाली मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट 17 जुलै 2015 रोजी रिलीज झाला होता. तब्बल सात वर्षांनंतर चाहत्यांना मुन्नी आणि बजरंगीची जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Bajrangi Bhaijaan


Kangana Ranaut Dhakd Release Date: कंगना राणावतचा धाकड हा सिनेमा पुढील वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे. लाल सिंग चड्ढा आणि केजीएफ या दोन सिनेमांशी रिलीज डेट क्लॅश होत असल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी हा सिनेमा 8 एप्रिल 2022 ला रिलीज होणार होता. कंगना राणावतने एका निवेदनात म्हटले होते की, 'धाकड हा माझ्या कारकिर्दीतील केवळ मैलाचा दगड नाही तर तो भारतीय चित्रपटसृष्टीसाठी टर्निंग पॉइंटही ठरेल. हा पहिला महिलाप्रधान अॅक्शन सिनेमा असणार आहे.

Dhakad Movie


अर्जुन रामपाल या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'रुद्रवीर' नावाच्या खलनायकाची भूमिका अर्जुन रामपाल साकारत आहे. 


त्याच्या फर्स्ट लूकचे पोस्टर शेअर करताना अर्जुनने लिहिले की, 'राक्षसाचे नवीन नाव रुद्रवीर आहे. एकाच वेळी शांत आणि तितकाच धोकादायक.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी