Bollywood celebrities : बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' म्हटला जाणारा अभिनेता शाहरुख खानचे फोटो आणिव्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दुसरीकडे, शाहरुख खानसोबत अक्षय कुमार, सैफ अली खान आणि सलमान खानही दिसतआहेत. अलीकडेच सलमान, अक्षय आणि सैफ अली खान शाहरुख खानच्या घरी मन्नत येथे पोहोचले. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण हे तिघे शाहरुखच्या घरी का पोहोचले होते, वाचा कारण
शाहरुख खानने सौदी अरेबिया रेड सी फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष मोहम्मद अल तुर्की यांच्यासाठी पार्टी आयोजित केली होती. शाहरुख खानच्या मन्नतवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. मोहम्मद अल तुर्कीने सोशल मीडियावर शाहरुख खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच वेळी, दुबईचे सांस्कृतिक मंत्री आणि अल-उलासच्या रॉयल कमिशनचे गव्हर्नर, बद्र बिन फरहान अलसौद यांनीही काही छायाचित्रे शेअर केली, ज्यामध्ये तो शाहरुख खान तसेच सलमान खान, सैफ अली खान आणि अक्षयसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये शाहरुख पांढऱ्या टी-शर्टमध्ये तर सलमान खान काळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर अक्षय आणि सैफही खूपच मस्त दिसत आहेत. मोहम्मद अल तुर्की आणि फरहान अलसौद यांनी शेअर केलेल्या दोन्ही फोटोंमध्ये शाहरुखचा लूक सारखाच आहे,
सैफ अली खान, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि सलमान खान यांची गणना बॉलिवूडमधील बड्या स्टार्समध्ये केली जाते. शाहरुख खान बऱ्याच दिवसांनी पठाण सिनेमातून कमबॅक करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत.तर दुसरीकडे सैफ अली खान हृतिकसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सलमान खान कतरिना कैफसोबत टायगर 3 साठी चर्चेत आहे. त्याचवेळी अक्षय कुमारकडेही अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत, ज्यात गोरखा, OMG 2, सेल्फी, रक्षा बंधन, मिशन सिंड्रेला, बच्चन पांडे, पृथ्वीराज आणि राम सेतू यांचा समावेश आहे.