Salman khan : सलमान खानला परत एकदा धमकीचा फोन आला आहे. आता ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. ईमेलमधील मजकूरात दिल्ली येथील तुरुंगात असलेल्या गुंड बिश्नोईच्या नावाचा उल्लेख असून त्याची दोन दिवसांपूर्वी मुलाखत दाखवण्यात आली होती. त्यामुळे आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्याला बंदुकीचा परवानाही देण्यात आला आहे.
"गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने. अगर नाही देखा तो बोल देना देख लेगा. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे" असा इमेल rohitgarg<rg6338615@gmail.com> या आयडीवरून पाठविण्यात आला आहे.
अधिक वाचा :रणबीरने हा डाइट फॉलो करत बदलून टाकला आपला लूक
2022 च्या जूनमध्ये वांद्रे येथे फिरायला गेले असताना सलीम खान यांना चिठ्ठी देण्यात आली होती. त्या चिठ्ठीमध्ये 'आपकाही जल्द मुसेवाला होगा' असे सलीम आणि सलमान खान यांना उद्देशून लिहिण्यात आले होते. या धमकीमागे गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा हात असल्याचे समोर आले होते. अशातच शुक्रवारी सलमानच्या ऑफिसमध्ये धमकीचा मेल आला. एका कर्मचाऱ्याच्या ईमेल आयडीवर पाठविण्यात आलेल्या या मेलमध्ये 'गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से' असे नमूद करण्यात आले आहे. अगली बार बडा झटका देंगे अशी धमकी या ईमेलमधून देण्यात आली आहे.