Bharat box office collection day 6: सलमान खानच्या भारत सिनेमाची कलेक्शन गाडी सुसाट

बी टाऊन
Updated Jun 11, 2019 | 17:00 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Bharat box office collection day 6: सलमान खानचा भारत सिनेमानं सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली आहे. हा सिनेमा आता यंदाचा सर्वांत जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. बऱ्याच सिनेमाला यानं मागं टाकलं आहे.

Bollywood superstar Salman Khan
Bharat movie: सलमान खानच्या भारत सिनेमाची कलेक्शन गाडी सुसाट  |  फोटो सौजन्य: Instagram

सलमान खान आणि कतरिना कैफचा आताच रिलीज झालेला भारत सिनेमानं सगळ्याच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. एवढंच नाही तर गेल्या सहा दिवसातच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर करून दाखवली. अली अब्बास जफरनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. भारत सिनेमा साऊथ कोरियन सिनेमा Ode To My Father यावर आधारित आहे. आज भारत सिनेमानं सहाव्या दिवशी ४२.३० कोटींचं कलेक्शन केलं. भारत सिनेमानं पाचव्याच दिवशी १५० कोटींची पल्ला पार केला. मात्र बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या सहाव्या दिवशी घट झाली आहे. 

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनं ट्विट करून भारत कलेक्शनची माहिती दिली आहे. सलमान खानचा सिनेमा भारतनं बुधवारी ४२.३० कोटी, गुरूवारी ३१ कोटी, शुक्रवारी २२.२० कोटी, शनिवारी २६.७० कोटी, रविवारी २७.९० कोटी आणि सोमवारी ९.२० कोटी रूपयांची कमाई केली. आतापर्यंत सिनेमाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १५९.३० कोटी रूपये झालं आहे. 

रविवारनंतर सोमवारी सिनेमाची कमाई घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यात रविवारी म्हणजेच १६ जूनला भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅचचा सिनेमावर परिणाम जाणवेल. मात्र तरी सुद्धा या आठवड्यात सिनेमा १७५ कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सहाव्या दिवशीच्या कलेक्शननंतर भारत सिनेमानं अक्षय कुमारचा सिनेमा केसरीला देखील पिछाडीवर टाकलं आहे. २०१९ मध्ये आतापर्यंत रिलीज झालेले सिनेमांमध्ये विकी कौशलचा उरी सिनेमा सर्वांत हायएस्ट ग्रॉसिंग सिनेमा आहे. त्यानंतर भारत, केसरी, टोटल धमाल आणि गली बॉय या सिनेमांचा नंबर लागतो. भारत सिनेमानं टॉप ५ च्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर आपली जागा बनवली आहे. 

या सिनेमात सलमाननं भारत नावाची व्यक्तीची भूमिका बजावली आहे. ज्याची बहिण आणि वडील भारत- पाकिस्तान विभाजनाच्या वेळी एक दुसऱ्यापासून वेगळे होतात. सिनेमात भारत (सलमान) त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात.  सिनेमात १९४७ पासून २०१० पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ज्यात सलमानचे ५ वेगवेगळे रूप बघायला मिळते. यात सलमाननं वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका केली आहे. 

भारत  रिलीज झाला तो ईदचा दिवस, त्याच दिवशी ५ जूनला टीम इंडियाची वर्ल्ड कपमधील पहिली मॅच होती. मात्र ‘भारत’च्या ओपनिंग डेवर याचा परिणाम झाला नाही आणि भारतनं पहिल्याच दिवशी तब्बल ४२.३० कोटींची कमाई केली. सलमान खानच्या आतापर्यंतच्या सिनेमांमधील ‘भारत’ची पहिल्या दिवसाची कमाई ही सर्वाधिक आहे. सलमाननं याबाबत ट्विट सुद्धा केलं होतं. सलमानच्या इतर चित्रपटांसारखाच ‘भारत’ हा चित्रपट सुद्धा एक कौंटुबिक सिनेमा आहे. ईदच्या सुट्टीचा सिनेमाला खूप फायदा झालाय.

या सिनेमाच्या निमित्तानं सलमानसोबत पुन्हा एकदा कतरिना कैफनं स्क्रिन शेअर केली. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सलमान कतरिना यांच्याव्यतिरिक्त सिनेमात जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, सोनाली कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका बघायला मिळतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Bharat box office collection day 6: सलमान खानच्या भारत सिनेमाची कलेक्शन गाडी सुसाट Description: Bharat box office collection day 6: सलमान खानचा भारत सिनेमानं सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली आहे. हा सिनेमा आता यंदाचा सर्वांत जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. बऱ्याच सिनेमाला यानं मागं टाकलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles