‘ही’ तारीख सलमान आणि विराट दोघांसाठीही आहे महत्त्वाची

बी टाऊन
Updated Apr 22, 2019 | 19:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

अभिनेता सलमान खान ५ जूनला आपल्या समोर त्याचा ‘भारत’ चित्रपट घेऊन येत आहे. त्याच दिवशी वर्ल्डकपची एक महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळं ५ जून ही तारीख सलमान आणि विराट दोघांसाठीही महत्त्वाची आहे.. जाणून घ्या कशी ते..

virat and salman_timesnow
‘ही’ तारीख सलमान आणि विराट दोघांसाठीही आहे महत्त्वाची  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: अभिनेता सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. रिलीज होताच ट्रेलरनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाची सलमान आणि कतरिनाचे फॅन्स खूप आतुरतेनं वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये सलमान-कतरिना सोबत सुनील ग्रोव्हरच्या भूमिकेचीही प्रशंसा केली जात आहे. चित्रपटाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. ‘भारत’ ५ जूनला रिलीज होणार आहे. मात्र सलमान खानच्या फॅन्स पैकी अनेकांचं चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. कारणही तसंच आहे, याच दिवशी टीम इंडियाची वर्ल्डकपमधील एक महत्त्वपूर्ण मॅच आहे.

सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर व्हायच्या काही दिवसांपूर्वी आयसीसी वर्ल्डकप २०१९च्या तारखांची घोषणा झाली आहे. त्यानुसार चित्रपट रिलीजच्या ५ जून या तारखेलाच टीम इंडिया आणि दक्षिण ऑफ्रिकेची महत्त्वपूर्ण मॅच आहे. त्यामुळं सलमान खान आणि विराटच्या फॅन्ससमोर काय करावं हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाहा 'भारत'चा ट्रेलर

 

 

सलमान खानच्या काही फॅन्सचं म्हणणं आहे की, त्यांच्या चित्रपटाला नेहमी खूप चांगलं ओपनिंग मिळतं म्हणून त्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलावी, कारण त्याच दिवशी मॅच असल्यानं ओपनिंगवर परिणाम होऊ शकतो.

सलमानला होणार फायदा

भारत आणि दक्षिण आफ्रिकेची ही मॅच दुपारी तीन वाजता सुरू होईल. तोपर्यंत सलमानच्या चित्रपटाचे सुमारे दोन शो पूर्ण झालेले असतील. सुरूवातीलाच पहिल्या दोन शोमध्ये तिकीटबारीवर काय कमाई होत आहे, याचं चित्र स्पष्ट होईल आणि लोकांना ही फिल्म कशी वाटली हे सुद्धा स्प्ष्ट होईल.

भले सलमानला शुक्रवारी थोडासा तोटा होईल पण विकेंडमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि चांगलाच फायदा होईल. भारतानं दक्षिण आफ्रिकेशी ही मॅच जिंकली तर याचा फायदा ‘भारत’ या चित्रपटाला नक्कीच होईल. कारण फिल्मचं नावच ‘भारत’ आहे आणि ही फिल्म देशभक्तीच्या पार्श्वभूमीवर असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट झालंय.   

सलमान खानच्या फॅन्सनं आधीच आयसीसीला सल्ला दिलेला आहे की, त्यांनी आपली मॅचची तारीख बदलावी. कारण सलमान खानची फिल्म रिलीज होणार आहे त्यामुळे त्यांच्या मॅचला प्रेक्षक मिळणार नाहीत आणि त्यांचं मोठं नुकसान होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘ही’ तारीख सलमान आणि विराट दोघांसाठीही आहे महत्त्वाची Description: अभिनेता सलमान खान ५ जूनला आपल्या समोर त्याचा ‘भारत’ चित्रपट घेऊन येत आहे. त्याच दिवशी वर्ल्डकपची एक महत्त्वाची मॅच आहे. त्यामुळं ५ जून ही तारीख सलमान आणि विराट दोघांसाठीही महत्त्वाची आहे.. जाणून घ्या कशी ते..
Loading...
Loading...
Loading...