सलमान खाननं मानले टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे आभार, काय आहे कारण

बी टाऊन
Updated Jun 12, 2019 | 21:38 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

सलमान खानचा भारत सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. मात्र अजूनही या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळतेय. त्यातच सलमान खाननं टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे आभार मानले आहेत. जाणून घेऊया नेमकं कारण. 

Salman Khan and Indian Cricketers
सलमान खाननं मानले टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे आभार, काय होतं कारण  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबईः बॉलिवूड एक्टर सलमान खानचा सिनेमा गेल्या आठवड्यात ईदच्या निमित्ताने रिलीज झाला. या सिनेमानं रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली आहे. सिनेमानं १५० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली असली तरी अजूनही सिनेमा चांगली कमाई करत आहे. सलमान खानच्या सिनेमासाठी प्रेक्षकांना किती क्रेझ आहे याचा अंदाज हे आकडे बघून लावता येईल. याच दरम्यान टीम इंडियाच्या क्रिकेटर्संनी वर्ल्ड कपमधून वेळात वेळ काढून इंग्लंडमध्ये भारत सिनेमा पाहिला आहे. टीम इंडियाच्या क्रिकेटर्संनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढला आणि सिनेमा पाहिला. 

क्रिकेटर केदार जाधवनं ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात टीम इंडियाचे खेळाडून हार्दिक पंड्या, शिखर धवन, केएल राहुल आणि महेंद्र सिंग धोनी दिसत आहेत. या फोटो शेअर करत केदारनं लिहिलं की, भारतची टीम भारत सिनेमा पाहिल्यानंतर. 

टीम इंडियाच्या क्रिकेटर्संनी सिनेमा पाहिल्यानंतर सलमान खाननं टीमचं आभार मानले आहेत. सलमान खाननं केदार जाधवची ही पोस्ट रि-ट्विट करत लिहिलं की, भारत (सिनेमा) ला पसंत केल्यानं भारत टीमचे आभार. भारत इंग्लंडमध्ये पाहण्यासाठी आपले आभार. तुम्हाला तुमच्या पुढच्या मॅचसाठी खूप शुभेच्छा. संपूर्ण भारत तुमच्यासोबत आहे. 

पहिल्या आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा पोहोचला शिवाय पहिल्या दिवशी ४२ कोटी ३० लाखांची कमाई करत सिनेमाने 2019च्या सगळ्यात मोठ्या ओपनिंगचा नवीन रेकॉर्ड बनवला. या आधी हा रेकॉर्ड पहिल्या दिवशी २१.६० कोटींची कमाई करत कलंक सिनेमाने केला होता. भारत सिनेमा रिलीजच्या ७ दिवसानंतर तब्बल २०० कोटींच्या जवळ पोहोचला असून लवकरच हा आकडा सुद्धा पार करेल अशी चिन्ह आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सीढ़ी , साड़ी , लड़की #Bharat #Promotions @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सिनेमाने पहिल्या दिवशी ४२.३० कोटी तर दुसऱ्या दिवशी ३१ कोटींची कमाई केली तर तिसऱ्या दिवशी हा आकडा २२.२० कोटी होता, चौथ्या दिवशी २६.७० कोटींचा गल्ला जमवला. तर बॉलिवूडच्या या ब्लॉकबस्टर भारतने पाचव्या दिवशी २७.९० कोटी कमावले, सहाव्या दिवशी ९.२० कोटी आणि सातव्या दिवशी ८.३० कोटी कमाई झाली. अस करत या सिनेमाने आत्तापर्यंत १६७.६० कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हा आकडा ८व्या दिवसाला १७५ कोटींच्या घरात जाईल असा अंदाज प्रसिद्ध फिल्म क्रिटीक तरण आदर्श यांनी वर्तवला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Interview, interviews and some more interviews. #Bharat @bharat_thefilm @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सहाव्या दिवशीच्या कलेक्शननंतर भारत सिनेमानं अक्षय कुमारचा सिनेमा केसरीला देखील पिछाडीवर टाकलं आहे. २०१९ मध्ये आतापर्यंत रिलीज झालेले सिनेमांमध्ये विकी कौशलचा उरी सिनेमा सर्वांत हायएस्ट ग्रॉसिंग सिनेमा आहे. त्यानंतर भारत, केसरी, टोटल धमाल आणि गली बॉय या सिनेमांचा नंबर लागतो. भारत सिनेमानं टॉप ५ च्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर आपली जागा बनवली आहे. 

या सिनेमात सलमाननं भारत नावाची व्यक्तीची भूमिका बजावली आहे. ज्याची बहिण आणि वडील भारत- पाकिस्तान विभाजनाच्या वेळी एक दुसऱ्यापासून वेगळे होतात. सिनेमात भारत (सलमान) त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतात.  सिनेमात १९४७ पासून २०१० पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ज्यात सलमानचे ५ वेगवेगळे रूप बघायला मिळते. यात सलमाननं वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका केली आहे.

या सिनेमाच्या निमित्तानं सलमानसोबत पुन्हा एकदा कतरिना कैफनं स्क्रिन शेअर केली. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त आहे. जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सलमान कतरिना यांच्याव्यतिरिक्त सिनेमात जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, सोनाली कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका बघायला मिळतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सलमान खाननं मानले टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे आभार, काय आहे कारण Description: सलमान खानचा भारत सिनेमा रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. मात्र अजूनही या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये बघायला मिळतेय. त्यातच सलमान खाननं टीम इंडियाच्या क्रिकेटर्सचे आभार मानले आहेत. जाणून घेऊया नेमकं कारण. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles