भारत सिनेमाच्या चौथ्या पोस्टरमध्ये सलमान खान नौदल अधिकाऱ्याच्या रूपात

बी टाऊन
Updated Apr 18, 2019 | 19:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan Bharat Film: सलमान खानचा आगामी भारत सिनेमाचा चौथं पोस्टर रिलीज झालं आहे. सिनेमाच्या चौथ्या पोस्टरमध्ये सलमान खान नौदल अधिकाऱ्याच्या रूपात दिसला आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.

Salman Khan Bharat Poster
भारत सिनेमाच्या चौथ्या पोस्टरमध्ये सलमान खान नौदल अधिकाऱ्याच्या रूपात  |  फोटो सौजन्य: Instagram

Salman Khan Bharat film 4th Poster relased: बॉलिवूड एक्टर सलमान खानचा सिनेमा भारत यावर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. काही गेल्या दिवसांपासून या सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज होत आहेत. आज सिनेमाचं चौथं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ ही दाखवण्यात आली आहे. हे पोस्टर शेअर करत सलमान खाननं कॅप्शन लिहिलं की, माझी माती, माझा देश. 

याआधी सलमान खानच्या या सिनेमाचे तीन पोस्टर समोर आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खान एक वयोवृद्ध व्यक्तिच्या रूपात दिसला. या पोस्टरमध्ये सलमान खान बराच गंभीर दिसत आहेत. यात त्यानं ग्रे रंगाचा ब्लेजर घातला आहे आणि चष्मा लावला आहे. या पोस्टरमध्ये काही घटनांची झलक दिसते. यात एक्टर जॅकी श्रॉफ देखील दिसत आहे. या सिनेमात जॅकीनं सलमान खानच्या वडिलांची भूमिका केली आहे. हे पोस्टर शेअर करत सलमान खाननं लिहिलं की, जेवढे सफेद केस माझ्या डोक्यावर आणि दाढीमध्ये आहेत त्यापेक्षा ही माझं रंगीन आयुष्य आहे. 

तर दुसऱ्या पोस्टरमध्ये सलमान खानचं यंग रूप बघायला मिळत आहे. त्यात सलमान त्याच्या वयापेक्षा खूप तरूण दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत सलमाननं कॅप्शन दिलं की, तारूण्या आमचं जानेमन होती. सिनेमाच्या तिसऱ्या पोस्टरमध्ये एक्ट्रेस कतरिना कैफ देखील दिसली. या पोस्टरला सलमाननं कॅप्शन दिलं, पुन्हा माझ्या आयुष्यात आली मॅडम सर. 

भारत सिनेमात सलमान खान एक्ट्रेस कतरिना कैफसोबत दिसेल. या व्यतिरिक्त सिनेमात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, तब्बू, वरूण धवन, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर सारखे कलाकार दिसतील. या सिनेमा कोरियन सिनेमा Ode to My Father चा हिंदी रिमेक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भारत सिनेमाच्या चौथ्या पोस्टरमध्ये सलमान खान नौदल अधिकाऱ्याच्या रूपात Description: Salman Khan Bharat Film: सलमान खानचा आगामी भारत सिनेमाचा चौथं पोस्टर रिलीज झालं आहे. सिनेमाच्या चौथ्या पोस्टरमध्ये सलमान खान नौदल अधिकाऱ्याच्या रूपात दिसला आहे. या सिनेमासाठी प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे.
Loading...
Loading...
Loading...