अभिनेता सलमान खानच्या बंगल्यात राहत होता चोर, पोलिसांनी केलं गजाआड

बी टाऊन
Updated Oct 10, 2019 | 18:59 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Caretaker of Salman's bungalow arrested: अभिनेता सलमान खानच्या बंगल्यातून चक्क एका चोराला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी हा अनेक वर्षांपासून सलमानच्या बंगल्यात राहत होता.

Caretaker of Salman Khan's bungalow arrested
सलमान खान (फाईल फोटो) 

थोडं पण कामाचं

  • मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
  • गेल्या अनेक वर्षांपासून वॉन्टेड असलेल्या आरोपीला अटक
  • अभिनेता सलमान खानच्या बंगल्यातून आरोपीला अटक
  • आरोपी शक्ती गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या बंगल्यात केअर टेकर होता

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बंगल्यातून चक्क एका गुन्हेगाराला अटक करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाचून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. मुंबई पोलिसांनी शक्ती राणा नावाच्या व्यक्तीला सलमान खानच्या बंगल्यातून अटक केली आहे. १९९० साली झालेल्या एका चोरी प्रकरणात पोलिसांनी आरोपी शक्ती राणा याला अटक केली आहे.

शक्ती राणा हा अभिनेता सलमान खानच्या बंगल्यात केअर टेकर म्हणून राहत होता. शक्ती राणा हा जवळपास १५ वर्षांपासून सलमानच्या बंगल्यात राहत होता. मात्र, याच राणावर १९९० मध्ये चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना त्याचा ठिकाणा कळाला आणि पोलिसांनी आरोपी राणाला बेड्या ठोकल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शक्ती राणा हा जामीनावर बाहेर होता आणि तेव्हापासून तो फरार झाला होता. न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट सुद्धा काढलं होतं. मात्र, शक्ती राणा हा फरारच होता. मुंबई पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, शक्ती राणा हा अभिनेता सलमान कान याच्या गोराई येथील बंगल्यात केअर टेकर म्हणून काम करतो. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सलमानच्या बंगल्यात प्रवेश करत आरोपी शक्ती राणा याला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राणा तब्बल २९ वर्षांपासून आपली ओळख बदलून राहत होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सूत्रांकडून गुप्त माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवली आणि आरोपी राणाला अटक केली. आरोपी शक्ती सिद्धेश्वर राणा हे ६२ वर्षीय आरोपी असून तो सलमानच्या बंगल्यात जवळपास १५ वर्षांपासून केअर टेकरचं काम पाहत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी