सलमानवर फिदा झाली ही अभिनेत्री, ‘भारत’च्या पोस्टरवर केलं कमेंट

बी टाऊन
Updated Apr 18, 2019 | 15:57 IST | टाइम्स नाऊ हिंदी

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ ईदच्या वेळी रिलीज होणार आहे. नुकतंच सलमाननं ‘भारत’चे काही पोस्टर्स रिलीज केले. त्यावर एका हॉलिवूडच्या अभिनेत्रीनं कमेंट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.

salman khan
सलमानवर फिदा झाली पेरिस हिल्टन  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान लवकरच नवा कोरा चित्रपट ‘भारत’ घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. नुकतंच त्याने चित्रपटाचे काही पोस्टर्स रिलीज केले. हे पोस्टर्स रिलीज होताच इंटरनेटवर व्हायरल झाले. सलमानच्या फॅन्सला हे खूप पसंत पडले. सलमानचे फक्त भारतीयच फॅन्स आहेत असं नाही तर आता सलमानं हॉलिवूडमध्येही आपली एक फॅन बनवली आहे. ही फॅन कुणी साधी-सुधी नाही तर हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोशलाईट पॅरिस हिल्टन आहे. तिला सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाचं पोस्टर आवडलं.सलमान खाननं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘भारत’चे तीन पोस्टर्स शेअर केले होते. यात एका पोस्टरवर पॅरिस हिल्टननं कमेंट केलंय.

 

peris hilton comment

या पोस्टरमध्ये सलमान तरुणाच्या लूकमध्ये दिसत आहे, हा त्याच्या रेट्रो लूकचा फोटो आहे. फोटोवर पेरिसनं सनग्लासेसवाल्या कूल चा इमोजी बनवला. सलमाननं या पोस्टर सोबत कॅप्शन दिलंय, ‘जवानी हमारी जानेमन थी’. या पोस्टरला आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय सलमाननं आणखी दोन पोस्टर्स शेअर केले होते. यातील एका पोस्टरमध्ये सलमान म्हाताऱ्या माणसाच्या लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरसोबत सलमाननं कॅप्शन लिहिलं आहे ‘जितने सफेद बाल मेरे सिर और दाढी में है, उससे कहीं ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रही है’.

 

तिसऱ्या पोस्टरमध्ये सलमाननं कतरिना कैफ सोबत स्वत:ला प्रस्तुत केलंय. यात सलमाननं कॅप्शन दिलं, ‘और फिर हमारी जिंदगी में आई मॅडम सर’. ‘भारत’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरनं केलं आहे. हा चित्रपट २०१४मध्ये रिलीज झालेल्या दक्षिण कोरियन चित्रपट ‘ओड टू माय फादर’चा अधिकृत रिमेक आहे. चित्रपटाची निर्मिती अतुल अग्निहोत्रीच्या रील लाईफ प्रॉडक्शन प्रा. लि. आणि भूषण कुमारच्या टी-सीरिज हे मिळून करत आहे.

या चित्रपटात सलमान खान सोबत अभिनेत्री कतरिना कैफ, दिशा पटानी तब्बू आणि नोरा फतेही सुद्धा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. भारत यावर्षी ईदच्या वेळी म्हणजेच ५ जून २०१९ला रिलीज होणार आहे. दरवर्षी सलमान खान आपल्या फॅन्ससाठी ईदच्या वेळी चित्रपट रिलीज करत असतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सलमानवर फिदा झाली ही अभिनेत्री, ‘भारत’च्या पोस्टरवर केलं कमेंट Description: सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ ईदच्या वेळी रिलीज होणार आहे. नुकतंच सलमाननं ‘भारत’चे काही पोस्टर्स रिलीज केले. त्यावर एका हॉलिवूडच्या अभिनेत्रीनं कमेंट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Loading...
Loading...
Loading...