Salman Khan ला वाटतेय लॉरेन्स बिश्नोई गॅंगची भिती !, मागितली रिवाॅल्वर ठेवण्याची परवानगी

Salman Khan meet Mumbai CP : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडताना दिसत आहे.

Salman Khan Meets Mumbai Police Commissioner, Threats Received From Lawrence Bishnoi Gang After Moosewala's Murder
Salman Khan वाटतेय लॉरेन्स बिश्नोई गॅंगची भिती !, मागितली रिवाॅल्वर ठेवण्याची परवानगी ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खानने पोलिस आयुक्तांची भेट घेतली
  • शस्त्रे ठेवण्यासाठी परवानगी मागितली
  • सलमानच्या कुटुंबीयांना धमक्या आल्या आहेत

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे शस्त्रे ठेवण्याची परवानगी मागितली आणि अर्ज केला. काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणे जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतरच सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. (Salman Khan Meets Mumbai Police Commissioner, Threats Received From Lawrence Bishnoi Gang After Moosewala's Murder)

अधिक वाचा : National Film Awards 2022 : अजय देवगण-सुर्या सर्वोत्कृष्ट अभिनेता, 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

सलमान खान मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सलमान खानने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत सलमान खानने शस्त्राबाबत परवानगी मागितली.

अधिक वाचा : Khatron Ke Khiladi 12: एलिमिनेशनबद्दल ऐकलं अन् अभिनेत्री बेभान होऊ नाचली!

काही दिवसांपूर्वी मूसवालाप्रमाणेच सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यानंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोक सलमान खानशी बोलण्याचाही प्रयत्न करतात, पण तो काहीही उत्तर देत नाही आणि सरळ त्याच्या गाडीत बसतो. व्हिडिओमध्ये सलमान खान लाल रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी