salman khan mother helen starts shooting for web show brown : मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची आई अभिनेत्री हेलन आता ८३ वर्षांची आहे. या वयात हेलन मनोरंजनसृष्टीत पुनरागमन करणार आहे. हेलनचे शूटिंग सुरू आहे. याआधी २०१२ मध्ये हेलनने भूमिका साकारलेला एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात करिश्मा कपूरची बहीण करिना प्रमुख भूमिकेत होती. करिनासोबतच्या त्या सिनेमानंतर हेलन तब्बल दहा वर्षांनी पुन्हा दिसणार आहे. यावेळी हेलन वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
अभिनय देव एक वेबसीरिज तयार करत आहे. या सीरिजचे शूटिंग २१ एप्रिलपासून सुरू आहे. वेबसीरिजमध्ये हेलन सोबत करिश्मा कपूर दिसणार आहे. सीरिजचे शूटिंग मागच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये सुरू होणार होते. पण कोरोना संकटामुळे शूटिंग पुढे ढकलण्यात अखेर २१ एप्रिलपासून शूटिंग सुरू झाले आहे.
करिश्मा याआधी मेंटलहुड या वेब शो मध्ये दिसली. यानंतर ती थेट हेलन सोबत दिसणार आहे.
हेलन एक ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांचे १९८१ मधे लग्न झाले. हेलन ही सलीम खान यांची दुसरी पत्नी आणि सलमानची सावत्र आई आहे. सलीम खान आणि हेलन या दांपत्याने पुढे एक मुलगी दत्तक घेतली. अर्पिता नावाच्या या मुलीचे सलीम खान यांच्या घरात भरपूर लाड झाले. सलमानचेही त्याच्या सर्वात लहान बहिणीवर प्रचंड प्रेम आहे.