Bigg Boss 14: टीआरपी घोटाळ्यावर स्पष्ट बोलला सलमान खान, ड्रग्स प्रकरणीही केले परखड वक्तव्य

बी टाऊन
Updated Oct 12, 2020 | 14:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

नुकताच मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी तीन संशयित वाहिन्यांचा खुलासा केला होता. यानंतर आता सलमान खानने बिग बॉस १४च्या वीकेंड का वार या भागात त्याच्यावर टीका करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर निशाणा साधला आहे.

Salman Khan
Bigg Boss 14: टीआरपी घोटाळ्यावर स्पष्ट बोलला सलमान खान, ड्रग्सप्रकरणीही केले परखड वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • नाव न घेता सलमान खानने साधला निशाणा
  • टीआरपीसाठी काहीही करू नये- सलमान खान
  • काय आहे टीआरपी घोटाळा?

मुंबई: मुंबई पोलिसांनी (Mumbai police) नुकतंच टीआरपी घोटाळा (TRP scam) प्रकरणी तीन संशयित वाहिन्यांचा (3 suspected channels) खुलासा केला होता. यानंतर आता सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस १४च्या (Bigg Boss 14) वीकेंड का वार या भागात त्याच्यावर टीका करणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर निशाणा (attacks news channels) साधला आहे. सलमानने कुणाचेही नाव घेतलेले (takes no name) नाही, पण ज्यापद्धतीने त्याने टीआरपीचा उल्लेख (mentions TPS) केला त्यावरून त्याचा रोख कुणाकडे होता हे सहज लक्षात येण्यासारखे आहे.

नाव न घेता सलमान खानने साधला निशाणा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात काही माध्यम संस्थांनी सलमान खानवर निशाणा साधला होता. याबाबत काही बोलणे सध्या उचित ठरणार नाही, पण सलमान खानने मात्र कोणाचेही नाव न घेता टीआरपी घोटाळ्यात नावे असलेल्या वाहिन्यांवर टीका केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv) on

बिग बॉसमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना सलमान खान म्हणाला की कुणीही फक्त टीआरपीसाठी काहीही करू नये आणि योग्य खेळ खेळावा. जर कारण नसताना कुणी आरडाओरडा करू लागले तर लोक टीव्ही बंद करतील आणि पुढे जातील. सोबतच त्याने असेही म्हटले की त्याला जे म्हणायचे होते ते त्याने म्हटले आहे, आता इतरांनी काय समजायचे ते समजावे.

टीआरपीसाठी काहीही करू नये- सलमान खान

या कार्यक्रमादरम्यान सलमान खानने म्हटले, ‘बिग बॉसमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात, आपण नेहमी चांगले खेळावे. टीआरपीसाठी काहीही करू नये. तुम्ही सर्वजण खूप चांगले खेळत आहात. पहिल्या दिवसापासून मी अशाप्रकारच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या नाहीत. यामुळे आपण आणखी चांगले व्हाल. प्रामाणिक राहा आणि सच्चे राहा.’

सलमान म्हणतो, लोक वाहिनी पाहणे बंद करतील

सलमान खान पुढे म्हणतो, ‘असे समजू नका की मी वायफळ बडबड करतो आहे. खोटे बोलत आहे. ओरडतो आहे. मुद्दा हा नाही. लोक आपली वाहिनी पाहणे बंद करतील. मला जे म्हणायचे होते ते मी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.’ काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या कार्यक्रमातही कीकू शारदानेही एका वृत्तवाहिनीच्या निवेदकाच्या रुपात येऊन नक्कल केली होती.

काय आहे टीआरपी घोटाळा?

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काही वाहिन्यांवर कारवाई केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की या वाहिन्या आपल्या घरी चालू ठेवण्यासाठी काही कुटुंबांना लाच देण्यात आली होती. यात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या मराठी वाहिन्यांसह वादग्रस्त रिपब्लिक टीव्हीचेही नाव आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी