सलमान खानचा बहुप्रतीक्षित राधे चित्रपट झाला प्रदर्शित, झी 5 अॅपचा सर्व्हर झाला क्रॅश

बी टाऊन
Updated May 13, 2021 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपले सर्व चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करणाऱ्या सलमान खानचा राधे हा झी 5 या ओटीटी मंचावर प्रदर्शित होणारा राधे हा पहिलाच चित्रपट आहे. आता हा चित्रपट काय कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Salman Khan and Disha Patani
सलमान खानचा बहुप्रतीक्षित राधे चित्रपट झाला प्रदर्शित, झी 5 अॅपचा सर्व्हर झाला क्रॅश 

थोडं पण कामाचं

  • सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट राधे प्रदर्शित
  • ईदच्या मुहूर्तावर झी 5वर सलमानच्या चित्रपटाचा प्रीमियर
  • मोठ्या संख्येने यूजर्सनी केले लॉगिन, झी 5चा सर्व्हर क्रॅश

 मुंबई :  Salman Khan Starrer Radhe Release: बॉलिवुड अभिनेता (Bollywood actor) सलमान खानचा (Salman Khan) राधे (Radhe) हा बहुप्रतीक्षित चित्रपट (awaited film) प्रदर्शित (released) झाला आहे. आपले सर्व चित्रपट (films) ईदच्या (Eid) मुहूर्तावर प्रदर्शित करणाऱ्या सलमान खानचा राधे हा झी 5 (Zee 5) या ओटीटी मंचावर (OTT platform) प्रदर्शित होणारा राधे हा पहिलाच चित्रपट आहे. सलमान खानच्या चाहत्यांनी (fans) मोठ्या प्रमाणात झी 5वर लॉगिन (login) केल्यामुळे या साईटचा सर्व्हर (site server) क्रॅश (crash) झाला होता. मात्र झी 5च्या टीमने परिस्थिती तात्काळ हाताळली आणि साधारण 1 तासानंतर अॅप (app) पुन्हा काम करू लागला. आता हा चित्रपट काय कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Zee5च्या प्रीमियम कस्‍टमर्सची निराशा

एकीकडे प्रचंड प्रमाणात लॉगिन झाल्यामुळे झी5चा सर्व्हर क्रॅश झाला तर दुसरीकडे यूजर्सनी Zee5 प्रीमियमवर राधे चित्रपट दाखवला जात नसल्याची तक्रार केली. तर ज्या लोकांकडे झी5चे सबस्क्रिप्शन आहे त्यांनाही हा चित्रपट पाहण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत. प्रेक्षक त्यांच्या या तक्रारी ट्विटरच्या माध्यमातून मांडत आहेत.

झी स्टूडिओने चित्रपटाच्या हक्कासाठी मोजले 235 कोटी

माध्यमांच्या बातम्यांनुसार या चित्रपटाचे सर्व स्वामित्व हक्क झी स्टूडिओने खरेदी केले आहेत आणि यासाठी त्यांनी तब्बल 235 कोटी रुपयेही मोजले आहेत. झी स्टूडिओने या चित्रपटाच्या वितरणाचे, व्हिडिओ स्ट्रीमिंगचे आणि संगीताचे हक्क विकत घेतले आहेत.

प्रभुदेवाने केले आहे राधे चित्रपटाचे दिग्दर्शन

‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खानपेक्षा 27-28 वर्षांनी लहान असलेली अभिनेत्री दिशा पटानीही आहे. तर रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ हेही या चित्रपटात दिसणार आहेत. यात सलमान खान एका अंडरकव्हर पोलिसाच्या भूमिकेत आहे तर खलनायक असलेला रणदीप हुड्डा गोव्याच्या एका हिंसक आणि सणकी स्वभावाच्या ड्रग माफियाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी