Salman Khan : सलमान खानचा भारतीय नौदलाच्या जवानांसाठी पोळ्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बी टाऊन
Updated Aug 12, 2022 | 22:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan :बॉलिवूड अभिनेता सलमान खानने ( Salman Khan ) विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाच्या जवानांसोबत काही वेळ व्यतीत केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यंदा भारत आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. या खास प्रसंगी बॉलिवूडही मागे नाही.

 Salman Khan spend quality time with Indian Navy
सलमान खानने भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत वेळ घालवला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सलमान खानने नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत वेळ व्यतीत केला.
  • स्वातंत्र्य दिनानिमित्त सलमान खानने भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसाठी पोळ्या केल्या
  • सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो व्हायरल होत आहेत.

Salman Khan : या वर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. या खास प्रसंगी बॉलिवूडही ( Bollywood ) मागे नाही. 'भाईजान' उर्फ ​​सलमान खान ( Salman Khan ) देखील त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून विशाखापट्टणमच्या सैनिकांसोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर ( Social Media ) प्रचंड व्हायरल होत आहेत. प्रत्येक फोटोला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत आहे. अभिनेता भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत मजामस्ती करतानाही दिसत आहे. (  Salman Khan spend quality time with Indian Navy )

अधिक वाचा : लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला


सलमान खानचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये सलमान खान नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत पुशअप करताना दिसत आहे. कधी ऑटोग्राफ देणे. तर कधी पोळ्या बनवणे तर कधी फोटोसाठी पोज देणे. एवढेच नाही तर या सर्वांसोबत तो तिरंगा फडकवत आहे. म्हणजेच या सर्व फोटो अभिनेता मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

salman khan

सलमान खानने ऑटोग्राफ दिला.

salman khan

सलमान खानने पोळ्या बनवल्या.

salman khan

सलमान खानने डंबेल उचलले.

salman khan

सलमान खानने डान्स केला.

salman khan

सलमान खानने पुशअप्स केले.

salman khan

सलमान खान टग ऑफ वॉर खेळताना दिसला.

salman khan

नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत पोझ देताना सलमान खान.

अधिक वाचा : म्हणून अर्जून तेंडूळकर गोव्याच्या टीममध्ये खेळणार


सलमान खानने भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत काही क्षण घालवले

सलमान खानही या गेटअपमध्ये जमिनीवर सिंगल हँडेड पुशअप्सही करताना दिसत आहे. तो अधिकार्‍यांशी टग ऑफ वॉरही खेळत आहे. डान्स करत आहे. सेल्फी घेत आहे. 
सलमान खानने आपला संपूर्ण दिवस या अधिकाऱ्यांसोबत घालवला आणि सलमान खानने आझादीचा अमृत महोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी