सलमानच्या ‘दबंग 3’चा क्लायमॅक्स लीक, या अभिनेत्यासोबत होणार शर्ट लेस फाईट

बी टाऊन
Updated May 15, 2019 | 16:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan: सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘दबंग 3’चं शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. यामध्ये पून्हा सलमान चुलबुल पांडेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा सोबतच चित्रपटाचा खलनायक मात्र नवीन आहे.

Salman Khan and Sudeep
सलमानच्या 'दबंग ३'चा क्लायमॅक्स लीक 

मुंबई: ‘दबंग ३’ मध्ये चुलबुल पांडे अर्थात सलमान खान पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार आहे. हिट फिल्म दबंगची ही तिसरी सीरिज बघण्यासाठी फॅन्स चांगलेच एक्साईटेड आहेत. या फिल्ममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. या फिल्ममध्ये यावेळी खलनायकाच्या भूमिकेत साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता सुदीप दिसणार आहे. सुदीप टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. या आधीच्या दबंग आणि दबंग २ मध्ये सोनू सूद आणि प्रकाश राज यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या होत्या. आता दबंग सीरिजच्या तिसऱ्या फिल्ममध्ये अभिनेता सुदीप असल्यानं उत्कंटता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता सुदीपनं नुकताच या फिल्मच्या क्लायमॅक्सबद्दल एक खुलासा केला आहे.

सुदीपनं ट्विट करत लिहिलं की 'दबंग 3 चा क्लायमॅक्स शूट खूपच हेक्टिक होतं. सेटवरील टीम खूपच शानदार आहे. सलमानबरोबर पहिल्यांदाच शर्ट काढून फाईट केली. खरंतर मी कधी कल्पनाच केली नव्हती, की मी असं काही करेन. या फिल्ममध्ये काम करून मी स्वतःसोबत खूप आत्मविश्वास घेऊन परत जातोय.'

 

 

अभिनेता सुदीपच्या या पोस्टनंतर हे स्पष्ट झालंय की सलमान खानच्या फॅन्सना त्याला पुन्हा एकदा शर्टलेस होताना बघता येणार आहे.

‘दबंग 3’मध्ये प्रेक्षकांना सलमान आणि सुदीपमध्ये चांगलीच फाईट बघायला मिळणार आहे. ‘दबंग 3’च्या क्लायमॅक्स सीनसाठी एक मोठा सेट तयार करण्यात आला आहे.

अभिनेता सुदीपनं आपल्या ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनंतर प्रेक्षकांमध्ये फिल्मबाबतची उत्सुकता चांगलीच वाढलेली आहे. सुदीपच्या ट्विटमधून हे देखील स्पष्ट होतंय की, फिल्ममध्ये सलमान आणि सुदीप हे चांगलीच धमाल उडवून देणार आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Chulbul is back..... #Dabangg3 @aslisona @arbaazkhanofficial @nikhildwivedi25 @prabhudheva @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

अभिनेता सलमान खान ‘दबंग ३’ सोबतच लवकरच ‘भारत’ चित्रपटातही झळकणार आहे. या फिल्ममध्ये वडील आणि मुलाचं नातं उलगडलेलं आहे. भारतचं शूटींगही सध्या सुरू आहे. या फिल्ममध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ झळकणार आहे. आतापर्यंत या दोघांची जोडी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतलेली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Finally #maheshwar schedule over #dabangg3 @prabhudheva @arbaazkhanofficial @nikhildwivedi25 @skfilmsofficial

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 

तर ‘दबंग ३’ या फिल्ममध्ये सलमान खान, सोनाक्षी सिन्हा यांच्या शिवाय सुदीप, अरबाज खान आणि माही गिल हे सुद्धा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ही फिल्म यावर्षीच डिसेंबर दरम्यान रिलीज होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी