Salman Khan : सनी देओलच्या 'या' हिट सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार सलमान खान

बी टाऊन
Updated Aug 05, 2022 | 19:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Salman Khan in Sunny Deol's hit movie remake :बॉलिवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan ) सनी देओलच्या (Sunny Deol ) हिट सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे. 1989 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता.

Salman Khan to act in tridev Remake
'त्रिदेव'च्या रिमेकमध्ये सलमान खान दिसणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सनी देओलच्या त्रिदेव या हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये सलमान खान दिसणार आहे.
  • सनी देओलचा हा चित्रपट 1989 साली रिलीज झाला होता.
  • सलमानला ही कल्पना आवडली असल्याचं म्हटलं जात आहे

Salman Khan to act in Sunny Deol's hit movie remake : बॉलीवूड अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) हा चित्रपट उद्योगातील सर्वात यशस्वी आणि अव्वल अभिनेत्यांपैकी एक आहे. सलामानचे लाखो चाहते आहेत. चाहते त्याच्या चित्रपटांच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असतात. आता सनी देओलच्या ( Sunny Deol ) एका हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये ( movie remake ) तो दिसणार असल्याचे वृत्त आहे. ( Salman Khan to act in Sunny Deol's hit movie tridev Remake )


या सिनेमाच्या रिमेकमध्ये दिसणार सलमान खान

1989 मध्ये सनी देओल, माधुरी दीक्षित, नसीरुद्दीन शाह, जॅकी श्रॉफ आणि दिवंगत अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला त्रिदेव हा सिनेमा रिलीज झाला, जो हिट ठरला. 
आता मिळालेल्या माहितीनुसार, या क्लासिक सिनेमाच्या रिमेकसाठी सलमान खानशी संपर्क साधण्यात आला आहे. वृत्तानुसार, मूळ सिनेमाचे दिग्दर्शन करणारे राजीव राय या प्रकल्पाबद्दल सलमान खानशी बोलले आणि अभिनेत्याला ही कल्पना आवडली.

अधिक वाचा : चष्मा वापरल्यामुळे पडणारे डाग सहज जातात


इतर स्टार कास्टच्या शोधत?

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी इतर कलाकारांसह नवीन दिग्दर्शकाच्या शोधात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात समकालीन टच असेल. या चित्रपटाची घोषणा लवकरच होणार आहे. जर आपण मूळ चित्रपटाबद्दल बोललो तर, 1989 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट होता. मैने प्यार किया आणि राम लखन या सिनेमांपेक्षा त्रिदेवने जास्त कमाई केली होती.


सलमान खानची सुरक्षा वाढवली


गेल्या काही दिवसांपासून सलमान चर्चेत आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यानंतर त्याने बुलेटप्रूफ कार वापरण्यास सुरुवात केली. अलीकडेच त्याला बंदुकीचा परवानाही मिळाला आहे. सलमान नुकताच त्याच्या बुलेटप्रूफ कारमधून विमानतळावर पोहोचला होता, त्याचे फोटोही समोर आले होते. सलमान खान त्याच्या पांढऱ्या रंगाच्या लँड क्रूझरमधून उतरताना फोटो क्लिक करण्यात आले होते. 

अधिक वाचा : या हॉलिवूड अभिनेत्रीने 200 लोकांशी केलंय रात्रीचं 'ते' काम

वर्कफ्रंट

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. पूजा हेगडेसोबत 'भाईजान' या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी