Bollywood actor Salman Khan : पनवेलच्या फार्महाऊसवर सलमान खानला सर्पदंश, चटकन गाठलं रुग्णालय

बी टाऊन
भरत जाधव
Updated Dec 26, 2021 | 13:59 IST

Salman Khan was bitten by  Snake :  सलमान खानच्या (Salman Khan ) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्याला (Actor) सर्पाने (Snake ) दंश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Salman Khan
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सर्पदंश   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अभिनेता सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करतो.
  • सलमान खानने गेल्या वर्षी त्याच्या फार्महाऊसवर जॅकलिन फर्नांडिससोबत एक गाणे शूट केले होते.
  • सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर रोजी तो आपला 56वा वाढदिवस साजरा करणार आहे.

Salman Khan was bitten by  Snake :   पनवेल: सलमान खानच्या (Salman Khan ) चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्याला (Actor) सर्पाने (Snake ) दंश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.  वाढदिवसापूर्वी सलमान खान पनवेलच्या (Panvel) फार्महाऊसला (FarmHouse ) रवाना झाला होता, तिथे त्याला साप (Snake) चावला होता. रविवारी सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याला उपचारासाठी (Treatment) एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) रात्री 3 .30 वाजता  नेण्यात आले. आज सकाळी नऊ वाजता त्यांना डिस्चार्जही (Discharge) देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

सलमान खानच्या हाताला साप चावला होता, दरम्यान डॉक्टरांनी सलमानला  विषविरोधी औषध (अँण्टी-वेनम) दिल्याने तो आता बरा आहे. औषध दिल्यानंतर काही तासांच्या निरीक्षणानंतर सलमान खानला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. आपल्याला माहित आहे की अभिनेता सलमान खान नेहमीच त्याचा वाढदिवस त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करतो. आज रात्री सलमान त्याच्या जवळच्या लोकांसाठी पार्टी ठेवण्याची शक्यता आहे. यासाठी सलमान आधीच फार्महाऊसवर पोहोचला होता, जिथे हा अपघात झाला. सुदैवाने साप बिनविषारी होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. या प्रकारानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारानंतर सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता त्याची प्रकृती ठीक असल्याचं समजतंय.दरम्यान, सलमान खान 56 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर रोजी तो आपला 56वा वाढदिवस साजरा करणार आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सलमान खानने बहुतेक दिवस पनवेलच्या फार्महाऊसवर घालवले होते. हे तेच फार्महाऊस आहे ज्याचे नाव त्याची बहिण अर्पिता खान शर्माच्या नावावर ठेवण्यात आले आहे. येथून अभिनेता सलमान खान घोडेस्वारीपासून ते शेतीपर्यंतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सलमान खानने गेल्या वर्षी त्याच्या फार्महाऊसवर जॅकलिन फर्नांडिससोबत एक गाणे शूट केले होते.

साधेपणानं साजरा करणार वाढदिवस

सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर साजरा करणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र या पार्टीत सहभागी होणार आहेत. सलमानचा प्लॅन असा आहे, की तो खूप लोकांना आमंत्रित करणार नाही. तसं प्रत्येक वेळी सलमान खानच्या वाढदिवसाला पाहुण्यांची यादी खूप मोठी असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सलमान आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करतोय.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी