Yashoda Hindi Trailer: समंथाच्या सस्पेन्स-थ्रीलर 'यशोदा' सिनेमाचा Trailer out, अभिनेत्रीचा अ‍ॅक्शन लूक

बी टाऊन
Updated Oct 27, 2022 | 20:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Samantha ruth prabhu Yashoda movie Hindi Trailer out : समंथा रुथ प्रभूचा (Samantha ruth prabhu) बहुप्रतीक्षित आगामी सिनेमा यशोदाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 5 भाषांमध्ये हा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता वरुण धवनने हिंदी भाषेतील ट्रेलर शेअर केला आहे.

Samantha ruth prabhu starrer Yashoda movie Hindi Trailer out
समंथाच्या 'यशोदा'चा ट्रेलर आउट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • समंथाच्या यशोदा सिनेमाचा हिंदी ट्रेलर रिलीज
  • एकाच वेळी 5 भाषांमध्ये रिलीज होणार सिनेमा
  • यशोदा सिनेमात समंथा रुथ प्रभूचा अ‍ॅक्शन लूक

Samantha ruth prabhu Yashoda movie Hindi Trailer out : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha ruth prabhu) हिचा आगामी सिनेमा 'यशोदा'(Yashoda movie) ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. याआधी सिनेमाचे पोस्टर आणि टीझर रिलीज झाले होते. तर नुकताच या सिनेमाचा ट्रेलर 5 भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. (Samantha ruth prabhu starrer Yashoda movie Hindi Trailer out )


ट्रेलरमध्ये समंथा गर्भवती महिलेच्या भूमिकेत अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. डॉक्टर समंथाला सांगतात की ती 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे. त्याचदरम्यान समंथा रुथ प्रभूला अनेक पण यादरम्यान,  गोष्टींची आठवण होते आणि  कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवते. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला हा सिक्वेन्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. यशोदाचा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक समंथा रुथ प्रभूचे कौतुक करताना थकत नाहीत. समंथाचे चाहते थिएटरमध्ये जावून हा सिनेमा पाहण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.  

अधिक वाचा : कार्तिकचा 'फ्रेडी' थिएटरमध्ये नाही, ओटीटीवर रिलीज होणार


वरुण धवनने 'यशोदा'चा हिंदी ट्रेलर शेअर केला आहे. तर तेलुगू भाषेतील विजय देवरकोंडा आणि मल्याळममधील दुल्कर सलमानने ट्रेलर रिलीज झाला आहे. तर सिनेमाचा तामिळमधील ट्रेलर सूर्याने रिलीज केला आहे. त्याशिवाय  777 चार्ली फेम रक्षित शेट्टीने कन्नड भाषेतील ट्रेलर लाँच केला आहे. 


या दिवशी सिनेमा रिलीज होणार

समंथा रुथ प्रभूचा हा सिनेमा 11 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. 
हरी आणि हरीश या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. हा एक पॅन इंडिया सिनेमा आहे. 

अधिक वाचा : 'आई कुठे काय करते'मध्ये ट्विस्ट पे ट्विस्ट


समंथाचे आगामी सिनेमा

समंथा रुथ प्रभू लवकरच विजय देवरकोंडासोबत कुशी या सिनेमात झळकणार आहे. या वर्षाच्या अखेरीस हा सिनेमा रिलीज होईल. त्याशिवाय अभिनेत्रीकडे अनेक बॉलिवूड सिनेमा आहेत. तसंच समंथा लवकरच अक्षय कुमारसोबत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्राणे आयुष्मान खुरानासोबतही ती स्क्रीन शेअर करणारआहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी